R. Praggnanandhaa : प्रग्यानंदाचा कार्लसनपाठोपाठ करुआनालाही पराभवाचा धक्का 

R. Praggnanandhaa : जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाच्या करुआनाचा पराभव करत प्रग्यानंदा आता स्वत: दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे 

159
R Praggnanandhaa : आर प्रग्यानंदाचा चिनी जगज्जेता डिंग लिरेनलाही दे धक्का
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आर प्रग्यानंदाने जागतिक स्तरावर आपला वरचष्मा कायम ठेवताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला कारुआना अशा दोन आघाडीच्या खेळाडूंना एकाच स्पर्धेत हरवण्याची किमया केली आहे. नॉर्वे बुद्धिबळ (Norway Chess) स्पर्धेत क्लासिक प्रकारात त्याने ही कामगिरी केली आहे. पाचव्या फेरीत कारुआनाचा पराभव केल्यानंतर स्वत: प्रग्यानंदाही जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (R. Praggnanandhaa)

(हेही वाचा- Plaster of Paris : प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाबत व्यवहार्य तोडगा काढा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती)

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्याने मॅग्नस कार्लसनला (Magnus Carlsen) हरवलं आहे. नॉर्वे बुद्धिबळ (Norway Chess) संघटनेनं ट्विटरवर एक मोठं ट्विट करत पहिल्यांदा प्रग्यानंदाच्या विजयाची बातमी दिली. ‘प्रग्या परतलाय! प्रग्याने जागतिक बुद्धिबळ जगताला पुन्हा एकदा धक्का दिलाय. तिसऱ्या फेरीत मॅग्नस कार्लसनला हरवल्यानंतर आता त्याने दुसऱ्या क्रमांकावरील कारुआनालाही धूळ चारली आहे,’ असं नॉर्वे बुद्धिबळ (Norway Chess) संधटनेनं आपल्या संदेशात म्हटलं आहे. (R. Praggnanandhaa)

प्रग्यानंदाने गेल्यावर्षी फिडेच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत पहिल्या दहांत पोहोचला होता. पण, त्यानंतर सातत्याच्या अभावामुळे तो क्रमवारीतील हे स्थान टिकवू शकला नाही. पण, या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा कमाल केली. क्लासिक प्रकारात त्याने कार्लसनला धक्का दिल्यानंतर हिकारु नाकामुरा विरुद्धचा सामना प्रग्यानंदाने गमावला होता. पण, आता परत पुनरागमन करताना त्याने पाचव्या फेरीत कारुआनाला मात्र मात दिली. (R. Praggnanandhaa)

प्रग्याचा कारुआना विरुद्धचा सामना बराच काळ तुल्यबळ अवस्थेत होता. पण, ६६ व्या चालीत कारुआनाकडून एक चूक झाली आणि त्याने आपलं शेवटचं प्यादं गमावलं. त्यानंतर प्रग्याने मिळालेली संधी गमावली नाही. आणि पुढील ११ चालीत विजय आपल्या नावावर केला. नाकामुरा अजूनही या स्पर्धेत आघाडीवर आहे. तर मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे आघाडीचे उद्योजक गौतम अदानी यांनी ट्विट करून प्रग्यानंदाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.  (R. Praggnanandhaa)

आता या स्पर्धेत प्रग्यानंदा ५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर नाकामुरा १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे प्रग्याला ही स्पर्धा जिंकणं कठीण जाणार असलं तरी त्याने दोन अव्वल खेळाडूंना हरवण्याची किमया या स्पर्धेत केली आहे. (R. Praggnanandhaa)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.