- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक (India’s Head Coach) म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचंच नाव आघाडीवर आहे. आणि आता त्यांनीही अलीकडेच एका मुलाखतीत सूचक विधान केलं आहे. ‘भारतीय राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होणं यापेक्षा दुसरा मोठा गौरव नसेल,’ असं गंभीरने अलीकडेच एका मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे गंभीरने या पदासाठी आपली दावेदारी उघड केली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक (T20 World Cup ) स्पर्धा संपली की, सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची मुदत संपत आहे. त्यांची जागा कोण घेतो हा भारतीय क्रिकेटमधील सध्याचा कुतुहलाचा विषय आहे. (India’s Head Coach)
(हेही वाचा- Heat stroke: दुदैवी! एकट्या मे महिन्यात राज्यसह देशभरात ४६ बळी, तर महाराष्ट्रात संख्या…?)
त्याचवेळी आबुधाबी इथं झालेल्या एका खाजगी कार्यक्रमात गंभीरने उघ़डपणे याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला मला नक्कीच आवडेल. याहून मोठा गौरव माझ्यासाठी नाही. तुम्ही १४० कोटी लोकांचं आणि भारताबाहेरील आणखी काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असता. ही खूप मोठी गोष्ट आहे,’ असं ४२ वर्षीय गंभीरने या मुलाखतीत म्हटलं आहे. (India’s Head Coach)
#WATCH | Abu Dhabi, UAE: “…I would love to coach the Indian team. There is no bigger honour than coaching your national team. You are representing 140 crore Indians and more across the globe as well and when you represent India, how can it get bigger than that? It is not me… pic.twitter.com/vWHJSXLyY0
— ANI (@ANI) June 2, 2024
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) अलीकडेच गंभीरची प्रशिक्षक पदासाठी पाठराखण केली होती. आता गंभीरने स्वत: या पदासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा माजी सलामीवीर असून विरेंद्र सेहवागसह त्याची सलामीची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. २००७ चा टी-२० विश्वचषक (T20 World Cup ) आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाने जिंकला तेव्हा गंभीर महत्त्वाचा खेळाडू होता. शिवाय आयपीएलमध्येही त्याच्या नेतृत्वाखाली गंभीरने कोलकाता संघाला दोनदा करंडक जिंकून दिला होता. आताही २०२४ च्या हंगामात तो कोलकाता संघाचा मेंटॉर होता. (India’s Head Coach)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community