Salman Khan प्रकरणात दुसऱ्या मॉड्युलमधील ५वा आरोपी गोगलीयाला हरियाणातून अटक

132
Salman Khan प्रकरणात दुसऱ्या मॉड्युलमधील ५वा आरोपी गोगलीयाला हरियाणातून अटक
Salman Khan प्रकरणात दुसऱ्या मॉड्युलमधील ५वा आरोपी गोगलीयाला हरियाणातून अटक

अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी रविवारी दीपक हवासिंग गोगलिया उर्फ ​​जानी वाल्मिकी (३०) याला हरियाणातून अटक केली आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या ५ झाली. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा एक कथित सदस्य गोगलिया हा सलमान खानला (Salman Khan) मारण्याच्या कटाचा एक भाग म्हणून इतर आरोपींची राहण्याची व्यवस्था आणि वाहने पुरवणार होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तो इतर आरोपींसोबत व्हॉट्सॲप ग्रुपवर सक्रीय होता आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या संपर्कात होता, असे पोलिसांनी सांगितले. (Salman Khan)

(हेही वाचा- Heat stroke: दुदैवी! मे महिन्यात राज्यासह देशभरात उष्माघाताचे बळी किती? जाणून घ्या)

बिश्नोई टोळीतील (Lawrence Bishnoi) ४ सदस्य धनंजय सिंग तपेसिंग उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ ​​न्यायी, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना आणि झीशान खान उर्फ ​​जावेद खान यांना अहमदाबाद आणि हैदराबाद येथून अटक केल्यानंतर गोगलियाचा ठावठिकाणा मिळाला होता, त्यानुसार त्याला हरियाणातुन अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाचही आरोपी टोळीच्या एका वेगळ्या मॉड्यूलचे भाग होते. जे १४ एप्रिल रोजी अभिनेत्याच्या वांद्रे येथील घरी गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या हल्लेखोरांच्या संपर्कात नव्हते. त्यांनी पाकिस्तान मधून पुरवलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून अभिनेता खान यांच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गुंडांच्या आदेशा वरून त्यांनी खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस, वांद्रे येथील निवासस्थान आणि मुंबईतील विविध शूटिंग लोकेशन्सचीही तपासणी केली, असे पोलिसांनी सांगितले. (Salman Khan  )

गोगलिया हा गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईत मुक्काम ठोकून होता. २ आठवड्यांपूर्वी तो हरियाणातील त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते. गोगलीयाचा ठावठिकाणा मिळताच नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी हरियाणा भिवानी येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंघला यांच्याशी संपर्क साधून आरोपीला पकडण्यासाठी त्यांची मदत घेतली आणि रविवारी त्याला ताब्यात घेऊन स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि ५ जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Salman Khan)

(हेही वाचा- R. Praggnanandhaa : प्रग्यानंदाचा कार्लसनपाठोपाठ करुआनालाही पराभवाचा धक्का )

बिष्णोई टोळीतील (Lawrence Bishnoi) काही सदस्य मागील काही दिवसांपासून पनवेल आणि कळंबोलीत राहत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांचे निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाल्यानंतर पनवेल पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा स्वतंत्र तपास सुरू केला. टोळीचे सदस्य लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या संपर्कात होते, असे माहिती देणाऱ्याने पोलिसांना सांगितले. त्याने व्हिडिओ कॉलद्वारे पोलिसांना हाय-टेक शस्त्रेदेखील दाखवली आणि त्यांना सांगितले की, त्यांचे शूटर, मुंबई, पनवेल, गुजरात आणि रायगडमध्ये लपलेले आहेत, ते बिश्नोई, रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई यांच्या आदेशाची वाट पाहत होते. त्यानुसार, पनवेल पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा नोंदवला, ज्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ (गुन्ह्याला उत्तेजन देणे), १२०(ब) (गुन्हेगारी कट) आणि ५०६(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Salman Khan)

पाकिस्तानातून शस्त्रे आयात करण्याचा डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेला कश्यप ऑगस्ट २०२३ पासून पनवेलमध्ये राहून पनवेल बस स्थानक आणि इतर ठिकाणी इतर सदस्यांसोबत बैठका घेत होता. बिश्नोई टोळीला शस्त्रे पुरवणाऱ्या डोंगर नावाच्या व्यक्तीमार्फत पाकिस्तानातून शस्त्रे आयात करण्याचा त्यांचा डाव होता. ही शस्त्रे राजस्थान सीमेवरून पनवेलला पोहोचणार होती. (Salman Khan)

(हेही वाचा- India’s Head Coach : ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल,’ – गौतम गंभीर )

आरोपींनी अल्पवयीन मुलांना या कटात सामील करून घेतले होते. खान याच्यावर हल्ला केल्यानंतर या टोळीची कन्याकुमारी येथे भेटण्याची होती. तेथून ते समुद्रमार्गे श्रीलंकेला पळून जाणार होते, त्यासाठी अनमोलने आर्थिक रसदची व्यवस्था केली होती. (Salman Khan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.