T20 World Cup 2024 : कोहलीने रोहितबरोबर सलामीला यावं असं गावसकर यांना का वाटतं?

T20 World Cup 2024 : विराट कोहलीने अलीकडेच संपलेल्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावली होती 

170
T20 World Cup 2024 : कोहलीने रोहितबरोबर सलामीला यावं असं गावसकर यांना का वाटतं?
T20 World Cup 2024 : कोहलीने रोहितबरोबर सलामीला यावं असं गावसकर यांना का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघ येत्या ५ जूनला टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024 ) स्पर्धेत आपला सलामीचा सामना आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. पण, त्यापूर्वी भारतीय संघात फलंदाजीचा क्रम काय असावा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातल्या अनेकांना वाटतंय की, रोहितबरोबर (Rohit sharma) विराट कोहलीने (Virat Kohli) सलामीला यावं. एरवी राष्ट्रीय संघात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये १५ सामन्यांत ७४१ धावा करत विराटने ऑरेंज कॅप पटकावली आहे. आणि पॉवर प्लेमध्ये विराटने १५० च्या वर स्ट्राईकरेट राखला होता. त्यामुळे विराटने सलामीला खेळावं, अशी मागणी जोर धरतेय.  (T20 World Cup 2024 )

(हेही वाचा- बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायिक Kumar Gera यांच्यावर गुन्हा दाखल)

आता यात दिग्गज खेळाडू सुनील गावसकरही (Sunil Gavaskar) सामील झाले आहेत. यापूर्वी गावसकर यांनी विराटवर (Virat Kohli) त्याच्या धिम्या स्ट्राईकरेटवरून टीका केली होती. पण, आता ते म्हणतायत की, ‘विराटने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केलीय, ते पाहता तोच सलामीचा दावेदार आहे. रोहितबरोबर (Rohit sharma) तो सलामीला यायला हवा. चांगले खेळाडू हे कायम चांगलेच असतात. डावी – उजवी जोडी सलामीला चांगली हे खरं असलं तरी गुणवत्ता ही सगळ्यात वर असते.’ (T20 World Cup 2024 )

डाव्या – उजव्या जोडीसाठी विराटला पहिली षटकं डगआऊटमध्ये बसायला लागू नये, असं गावसकर यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. ‘रोहीत आणि विराट हे आपले सर्वोत्तम दोन फलंदाज आहेत. तांत्रिक दृष्ट्या डावी – उजवी जोडी असणं ठिक आहे. पण, मैदानात कामगिरी बोलते. आणि विराटला (Virat Kohli) एक षटक का होईना, पण, वाट बघायला लावणं चुकीचं आहे,’ असं गावसकर याविषयी बोलताना म्हणाले.  (T20 World Cup 2024 )

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी)

विराट कोहली (Virat Kohli) या आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये होता. आणि ७४१ धावा करताना त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचबरोबर पहिली ६ षटकं म्हणजे पॉवर प्लेमध्ये तो जास्त प्रभावी दिसून आला. (T20 World Cup 2024 )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.