- ऋजुता लुकतुके
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात, एनएचएआयने (NHAI) सोमवार म्हणजे ३ जूनपासून देशातील एक्सप्रेस वे म्हणजे महामार्गांवरील टोल हा ५ टक्क्यांनी वाढवला आहे. प्राधिकरणाने दरवाढीचा प्रस्ताव १ एप्रिल २०२४ ला केंद्र सरकारसमोर ठेवला होता. पण, सार्वत्रिक निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. टोल दरवाढीचा हा वार्षिक नियमित प्रस्ताव असल्याचं एनएचएआयने म्हटलं आहे. (Toll Rate Hike)
नवीन टोल दर हे ३ जूनपासून देशभरात लागू होणार आहेत. देशातील घाऊक महागाई दर लक्षात घेऊन ही दरवाढ झाली असल्याचं एनएचएआय (NHAI) प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. (Toll Rate Hike)
The National Highways Authority of India (NHAI) has announced a 5% toll hike at 1,100 toll plazas nationwide, effective June 3, 2024. This delayed decision, due to the Lok Sabha Elections 2024, follows the annual revision process usually conducted in April.#TollHike #NHAI pic.twitter.com/EyeMA2pimt
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) June 3, 2024
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी)
भारतात महामार्गांचं जाळं आता विस्तारत आहे. आणि अशावेळी देशभरात एकूण ५८८ टोलनाके आहेत. आणि त्यापैकी ६७५ बांधकामं ही खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी केलेली आहेत. तर १८० टोलनाके हे खाजगी-सार्वजनिक क्षेत्राच्या सहकार्याने उभारलेले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर आता सुधारित दर पुढील प्रमाणे असतील, (Toll Rate Hike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community