राज्यात 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना आखणी एक इशारा दिला आहे. मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत मोठी वाहतूक कोंडी दिसली, ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुक्त संचार केला तर याद राखा, निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशाराच त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या 2ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ झाला, यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मी कार्यक्रमाला येत असताना मुंबईतील ट्रॅफिक पाहून अचंबित झालो. त्यामुळे जनतेशी संवाद साधताना मी चुकून निर्बंध उठवण्याची घोषणा केली की काय, असे मला वाटले. त्यामुळे मी असे काही बोललो का याची काही जणांकडे चौकशी केली, पण मी तसे काही बोललो नसल्याचे लक्षात आले. मी कोणतेही निर्बंध उठवलेले नाहीत, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. पण रहदारी अशीच वाढली आणि नागरिकांचा मुक्त संचार असाच सुरू राहिला तर निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
(हेही वाचाः मेट्रो- २,७ चाचणी शुभारंभ! प्रकल्पाचे जनक फडणवीसांना नाही निमंत्रण! )
मुख्यमंत्री काय म्हणाले संपूर्ण भाषणात?
- हे सांघिक यश आहे. अहिल्याबाईंनी संतपरंपरेने दिलेला वारसा पुढे नेण्याचे काम जरी आपण करू शकलो, तरी महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील.
- नेतृत्व माझ्याकडे असले, तरी हे कर्तृत्व माझ्या टीमचे आहे.
- प्रशासकीय सहकारी आणि महाराष्ट्रातील जनतेचे हे श्रेय आहे.
- कोणतेही श्रेय हे एकट्या कॅप्टनचे कधीच नसते.
- शहराला दिशा आणि वेग देणारा हा कार्यक्रम.
- रस्त्यांचा एफएसआर वाढवता येत नाही. उड्डाणपूल आणि रस्त्यावर रस्ते बांधतो आहोत.
- तरी विकास आणि वेग कायम राखण्याचा प्रयत्न, पुढचा टप्पा अधिक वेगाने पार पाडावा.
- मेट्रोच्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले हे भाग्य.
- ज्या मुंबईत जन्मलो ती मुंबई बदलताना पाहणे आनंददायी.
- काम होतात, रस्ते होतात, मेट्रो होते पण तुमचे काम मी कलाकाराच्या नजरेतून बघतो तेव्हा ते अगदी आखीव रेखीव आणि देखण आहे. मेट्रो स्टेशन, मेट्रो कोच देखणे.
- हे कोच आपल्या देशात बनवले यावर विश्वास बसत नाही.
- कोविड केअर, चाचणी केंद्र, ऑक्सिजनचे प्लांट ओपन करत आहोत.
- मागील काही कालावधीपासून असेच कार्यक्रम आपण करत आहोत.
- अजून कोरोना गेलेला नाही, कोरानाची अडचण आजही आहे.
- परंतु अशाही परिस्थितीत काम थांबू दिले नाही, याबद्दल राजीवजी आणि सोनिया सेठी यांचे अभिनंदन. मुंबईकरांच्यावतीने मी आभार मानतो.
- कामाचा वेग मंदावला, पण काम थांबवू दिले नाही हे महत्वाचे आहे.
(हेही वाचाः ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू! पण ‘हे’ आहेत नवीन बदल)
- सध्या निर्बंध आहेत, पण निर्बंध उठतील तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक पटीने आपले आयुष्य गतिमान होण्यासाठी ही कामे उपयुक्त.
- रस्त्यावरची आजची गर्दी पाहून मी ही चिंतीत.
- मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरानाविषयक बंधने आपण उठवलेली नाहीत.
- कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशीच गर्दी होत राहिली तर संथ गतीने सुरू करत असलेल्या आपल्या हालचालींना ब्रेक लागेल.
- मुंबईत अशीच गर्दी राहिली तर मुंबईत सुद्धा कडक बंधने लावावी लागतील.
- गच्चीत उभे राहिलो तर चौफेर खाडी आणि कांदळवन दिसायची. आताच्या दिसणाऱ्या इमारती नव्हत्या
आता कांदळवन शोधावे लागते. - चटईक्षेत्र म्हणजे ऊंच इमारती, त्यांच्या पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था, जनतेच्या येण्या-जाण्याची सोय कशी करायची हा प्रश्न.
- नव्या पिढीला आणि नव्या विचारांना पुस्तकात नाही तर प्रत्यक्षात आणून दाखवले.