१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीने जागतिक विक्रम केले असल्याचा दावा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी (३ जून) केला. स्वातंत्रोत्तर भारताच्या इतिहासात निवडणुकीच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाने (Election Commission) पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. (Election Commission)
स्वातंत्रोत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी अशा प्रकारची पत्रकार परिषद कधीही घेण्यात आली नव्हती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, या निवडणुकीत मतदारांनी अनेक विक्रम केले आहेत. महिलांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. यावेळी ३१ कोटी महिलांनी मतदान केले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी मतदान करण्याची ही पहिलीच वेळ होय, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. (Election Commission)
(हेही वाचा – Election Commission: निवडणूक आयोगाने निकालापूर्वी प्रथमच घेतली पत्रकार परिषद, निवडणूक काळात केलेल्या कामांबाबत म्हणाले…)
निवडणुकीत जागतिक विक्रम केला
सीईसी राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) ३१ कोटी २० लाख महिलांसह ६४ कोटी २० मतदारांच्या सहभागाने जागतिक विक्रम केला आहे. हा आकडा जी-७ देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपीयन देशांच्या मतदारांच्या २.५ पट आहे. याशिवाय, ८५ वर्षापेक्षा जास्त मतदारांनी घरी बसून मतदान केले. याची टक्केवारी सुद्धा खूप जास्त आहे. (Election Commission)
यावेळी फेरमतदान घटले
सीईसी म्हणाले की, मतदान कर्मचाऱ्यांच्या काटेकोर कामामुळे यावेळी पुन्हा मतदान घेण्याची वेळ फारशी आली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) आम्ही ३९ ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले. २०१९ मध्ये ५४० ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले होते. यातही ३९ मधील २५ रिपोल फक्त २ राज्यांमध्ये झाले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ही त्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी एक आहे ज्यामध्ये आम्ही हिंसाचार पाहिला नाही. यासाठी दोन वर्षांची तयारी करावी लागली. आम्ही मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे, असेही सीईसी म्हणाले. (Election Commission)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community