Delhi Mumbai Akasa Air Flight: दिल्ली-मुंबई आकासा एअरचे विमान अहमदाबादकडे वळवले; का घेतला निर्णय? जाणून घ्या

174
Delhi Mumbai Akasa Air Flight: दिल्ली-मुंबई आकासा एअरचे विमान अहमदाबादकडे वळवले; का घेतला निर्णय? जाणून घ्या

दिल्ली-मुंबई आकासा एअरचं विमान सोमवारी सकाळी ऑनबोर्ड सुरक्षा अॅलर्टनंतर अहमदाबादकडे वळवण्यात आलं. या फ्लाइटमध्ये १ बाळ आणि ६ क्रू यांच्यासह तब्बल १८६ प्रवासी होते. अहमदाबादला वळवल्यानंतर सकाळी १०.१३ वाजता विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. (Delhi Mumbai Akasa Air Flight)

आकासा एअरच्या प्रवक्त्याने इंडिया टुडेला दिलेली माहिती अशी की, ‘कप्ताननं सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियेचे पालन केले आणि विमानतळावर लँडिंग केलं. अकासा एअर जमिनीवर सर्व सुरक्षा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करत आहे’, असं अकासा एअरच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव किंवा धोक्यांमुळे गेल्या ३ दिवसांत वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या अनेक फ्लाइट्सनं आपत्कालीन लँडिंग केलं आहे. (Delhi Mumbai Akasa Air Flight)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : मुष्टीयोद्धा अमित पनघलला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा )

विमानतळ प्राधिकरणाकडून त्वरित कारवाई
रविवारी, ३०६ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणारं विस्तारा फ्लाइट, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर शहरात उतरले. शनिवारी, (१ जून) सायंकाळी अशीच एक घटना घडली. ज्यामध्ये वाराणसी-दिल्ली इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणांनी त्वरित कारवाई केली. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला आणखी एक बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याचं मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.