- ऋजुता लुकतुके
आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) रविवारी एका मोठ्या सोहळ्यात आपली वाग्दत्त वधू श्रुती रघुनाथनशी लग्नगाठ बांधली. कोलकाता फ्रँचाईजीने सोशल मीडियावर दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. (Venkatesh Iyer)
Congratulations Venkatesh & Shruti, you’re winning in life 🤗 pic.twitter.com/fmdakZGhTH
— KolkataKnightRiders (@KKRiders) June 2, 2024
अलीकडेच संपलेल्या आयपीएल (IPL) स्पर्धेत कोलकाता संघासाठी वेंकटेश अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी अंतिम फेरीतही त्याने २६ चेंडूंत ५२ धावा केल्या होत्या. वेंकटेशने २०० च्या स्ट्राईकरेटने या धावा करताना अगदी दहाव्या षटकातच कोलकाताला विजय मिळवून दिला होता. २०२४ च्या हंगामात वेंकटेशने ४६ धावांच्या सरासरीने ३७० धावा जमवल्या आणि यात त्याचा स्ट्राईकरेटही १५८ धावांचा होता. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती ७० धावांची. (Venkatesh Iyer)
२९ वर्षीय वेंकटेश कोलकाता संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. आणि खासकरून बाद फेरीत त्याने संघासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे. कोलकाता संघासाठी वेंकटेश (Venkatesh Iyer) बाद फेरीचे एकूण ५ सामने खेळला आहे आणि यात ७७ धावांच्या सरासरीने त्याने २३२ धावा केल्या आहेत. २०२१ साली कोलकाताचा अंतिम फेरीत चेन्नई विरुद्ध पराभव झाला. पण, या सामन्यात वेंकटेशने ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या होत्या. तर आणखी एका सामन्यात त्याने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. बाद फेरीत त्याने एकूण ४ अर्धशतकं केली आहेत आणि या बाबतीत तो चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनापेक्षा थोडाच मागे आहे. रैनाने बाद फेऱ्यांमध्ये एकूण ७ वेळा अर्धशतकं ठोकली आहेत. (Venkatesh Iyer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community