शहरातील कलवड परिसरात काही धर्मांध मुसलमानांनी (Muslim) सरकारी जमिनीचा ताबा मिळवून त्यावर बेकायदेशीरपणे मदरसा उभारल्याचे निदर्शनास आले आहे. लोकसभा निवडणुकीचा फायदा घेत येथील जमिनीवरील झाडे तोडून, नाल्यांमध्ये भराव टाकून, त्यावर एक मोठे पत्र्याचे शेड उभारून हा मदरसा उभारला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा Jarange Patil यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा विरोध)
त्यांच्या म्हणण्यानुसार या बेकायदेशीर बांधकामाला पुणे महानगरपालिकेकडून कुठलीही परवानगी दिलेली नसून बेकायदा शेड उभारून हा मदरसा चालवला जात आहे. स्थानिकांच्या विरोध प्रदर्शनानंतर मुस्लिम (Muslim) मौलानाकडून स्थानिक नागरिकांना उडवा – उडवीची उत्तरे देण्यात आली. उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामावर व मदरश्यावर कुठलीही कारवाई झाली नसून पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष केरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community