Arun Gawli : अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

174
Arun Gawli : अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Arun Gawli : अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कुख्यात गुंड अरुण गवळी उर्फ डॅडीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरुण गवळी (Arun Gawli) याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपिठासमोर सुनावणी पार पडली आहे. उच्च न्यायालयाने २००६ च्या धोरणावर विश्वास ठेवत हा निर्णय दिला असल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

(हेही वाचा – Muslim धर्मांधांनी नाल्यात उभारला बेकायदेशीर मदरसा)

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. या विरोधात राज्य सरकारने ही याचिका दाखल करण्यात आली होती. ३ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रश्नी सरकारला दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले होते. ही मुदत संपली आहे. गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका अरूण गवळीने सर्वोच्च न्यायालयात केली होती.

२००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५ च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६ च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले होते. (Arun Gawli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.