Vidhan Parishad Election मध्ये महायुती आमने-सामने; BJP चे तीन उमेदवार जाहीर

ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर यांचे अर्ज दाखल

194
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी मतदान

लोकसभा निवडणूक एकत्र लढविणारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील घटक पक्ष विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने सोमवारी विधान परिषदेच्या तीन उमेदवरांची घोषणा केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने ही निवडणूक महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढविण्याची चिन्हे आहेत. (Vidhan Parishad Election)

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असताना भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली आहे. त्यानुसार विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून अशी आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात कोकण भवनात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग राहणार आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – काँग्रेसच्या MLA Yashomati Thakur यांची गृहयुद्धाची भाषा; म्हणतात Amravati मध्ये काँग्रेसचा पराभव झाला तर…)

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचा दबदबा असतानाही मनसे आणि अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना भाजपाने सोमवारी नवी दिल्लीतून महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची नावे घोषित केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत म्हणजे १२ जून २०२४ पर्यंत महायुतीत विधान परिषद निवडणुकीबाबत तोडगा निघाला नाही तर महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. (Vidhan Parishad Election)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांनी सोमवारी अनुक्रमे कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, प्रकाश फातर्फेकर, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर आदी उपस्थित होते. (Vidhan Parishad Election)

विधान परिषदेसाठी भाजपाने जाहीर केलेले उमेदवार

  • निरंजन डावखरे : कोकण पदवीधर
  • किरण शेलार : मुंबई पदवीधर
  • शिवनाथ दराडे : मुंबई शिक्षक

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.