४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections 2024) निकाल जाहीर होणार आहे. माध्यमांतून आलेल्या एक्झिट पोलनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणता उमेदवार जिंकणार, कोणता उमेदवार हारणार याविषयी चर्चा चालू आहेत. एक्झिट पोलच्या (Exit polls) अंदाजानुसार समोर आले आहेत. यात अमरावतीतून नवनीत राणा विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान यासंदर्भात आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. अमरावतीत इंडिया आगाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास गृहयुद्ध होईल, असा इशारा आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी दिला आहे. अमरावतीत माध्यमांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या महिला आमदाराने निकालाच्या आदल्याच दिवशी गृहयुद्धाची भाषा केल्याने उलटसुलट चर्चा चालू आहेत.
(हेही वाचा – Arun Gawli : अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती)
म्हणे, ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या
यशोमती ठाकूर या वेळी म्हणाल्या की, “अमरावती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. अमरावतीत इंडि आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित आहे. याबाबत ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या. जर अमरावतीत इंडि आघाडीच्या उमेवादाराचा पराभव झाला, तर सिव्हिल वाॅर होईल.”
पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी – रवी राणा यांची मागणी
यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना आमदार रवी राणा यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “अमरावतीतील जनता लोकशाहीच्या माध्यमातून नवनीत राणा (Navneet Rana) यांना विजयी करणार आहेत. त्यामुळे हताश काँग्रेसकडून महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशोमती ठाकूर यांच्यासारख्या महिला लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे धमक्या देत असतील, तर ते योग्य नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली पाहिजे”, अशी मागणी आमदार राणा यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community