Best Electric Supply : बेस्टच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक दोष, दुरुस्तीला होतोय विलंब?

236
BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा

मुंबईत एका बाजुला उन्हाच्या पारा वाढलेला असतानाच शहर भागात अनेक ठिकाणी बत्ती गुल होत असल्याचे प्रकार घडत आहेत. शहर भागांमधील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होत असून केवळ दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्यानेच वीज पुरवठा सुरळीत राखण्यास विलंब होत असल्याची कारणे समोर येत आहे. (Best Electric Supply)

मुंबईतील वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढत असून प्रत्येक घरांमध्ये या वाढत्या उकाड्यामुळे पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा सुरु ठेवले जात आहे. मात्र, या वाढत्या विजेच्या मागणीमुळे बेस्टच्या माध्यमातून वीज पुरवठा केल्या जाणाऱ्या शहर भागांमध्ये विजेच्या तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहे. शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात तांत्रिक दोष निर्माण होऊन बत्ती गुल होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात विलंब होत असल्याने अनेक भागांमध्ये अनेक तास वीज पुरवठा सुरुळीत होत नाही. (Best Electric Supply)

(हेही वाचा – काँग्रेसच्या MLA Yashomati Thakur यांची गृहयुद्धाची भाषा; म्हणतात Amravati मध्ये काँग्रेसचा पराभव झाला तर…)

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही याला दुजोरा दिला असून मुंबईतील महापालिकेच्या एफ उत्तर परिसरात मागील २ ते ३ दिवस वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत. बेस्ट प्रशासनाकडे तक्रार करून देखील काहीही उपयोग होत नाही. आधीच प्रचंड उकाडा असताना वीज नसल्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यातच वीज नसल्याने लोक बेहाल होत आहेत, असे रवी राजा यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Best Electric Supply)

रवी राजा यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, मी स्वतः बेस्ट कमिटीवर अनेक वर्ष काम केलेलं असल्यामुळे काही अधिकाऱ्यांशी बोललो, तेंव्हा मला असे सांगण्यात आले की दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच उपलब्ध नाही. कर्मचारी कमी ठेवून, योग्य सेवा न देऊन एक प्रकारे खाजगीकरणाला वाव दिला जात आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत जर अनेक तास वीज जात असेल तर कसं चालेल असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. (Best Electric Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.