Maharashtra Lok Sabha Election 2024 निकालाचे काउंटडाऊन सुरू, महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने?

224
Maharashtra Lok Sabha Election 2024 निकालाचे काउंटडाऊन सुरू, महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने?
Maharashtra Lok Sabha Election 2024 निकालाचे काउंटडाऊन सुरू, महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने?

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई (Maharashtra Lok Sabha Election 2024) रंगल्याचं यंदा पाहायला मिळालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली. शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट झालेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Maharashtra Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result : फडणवीस, शिंदे, ठाकरे, पवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारा निकाल)

तब्बल 43 दिवसांसाठी चाललेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Lok Sabha Election 2024) काही तासात जाहीर होणार असून, आता पहिले कलही येण्यास सुरुवात होणार आहे. भाजपप्रणीत एनडीएला एक्झिट पोलमध्ये कौल मिळालेले दिसले. त्यानुसार देशात त्यांचीच सत्ता कायम राहते की, इंडिया आघाडीला मतदार संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. (Maharashtra Lok Sabha Election 2024)

कुठे पाहता येतील लोकसभा निवडणूक निकालांचे Live आकडे? (Maharashtra Lok Sabha Election 2024)

  • www.results.eci.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही लोकसभा निवडणूक निकालाचे आकडे पाहू शकता.
  • सर्वप्रथम वरील संकेतस्थळाला भेट द्या आणि तिथं Parliamentary Constituencies वर क्लिक करा. तुमच्यासमोर सविस्तर यादी येईल.
  • तुम्हाला एखाद्या ठराविक जागेचे निकाल अपेक्षित असल्यास राज्य आणि त्यानंतर मतदारसंघ निवडा.
  • मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळातच ही आकडेवाही संकेतस्थळावर अपडेट होण्यास सुरुवात होईल.
  • iOS आणि अँड्रॉईड मोबाईल वर Voter Helpline अॅपचाही वापर तुम्ही करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.