Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या कारकीर्दीतील १० सर्वोच्च क्षण

212
Hardik Pandya : ‘पाच बोटं…पण..’ हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
  • ऋजुता लुकतुके

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा सध्या क्रिकेटच्या मैदानावरील अपयशामुळे चर्चेत असला तरी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूचं त्याचं स्थान सध्या तरी अढळ आहे. मध्यमगती गोलंदाज आणि घणाघाती फलंदाज ही संघातील जागा कपिल देव नंतर हार्दिक पांड्यानेच समर्थपणे भारतीय संघात पेलली आहे. आणि आता आयपीएलमध्ये अपयशी ठरला असला तरी लढवय्या खेळाडू अशी त्याची ओळख आहे. आणि आताही टी-२० विश्वचषकात पाचव्या क्रमांकावरील त्याची जागा सध्या तरी कुणी घेऊ शकणार नाही.

त्याच्या फॉर्मविषयी उलट सुलट चर्चा सुरू असताना माजी क्रिकेटपटूही हार्दिकच्या बाजूने उभे राहिले आहेत ते त्याच्यातील क्षमतेमुळे. ‘तो मोठ्या स्पर्धेसाठीचा खेळाडू असल्यामुळे टी-२० विश्वचषकात तो चांगली कामगिरी करेल,’ असा विश्वास अलीकडेच सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

हार्दिक पांड्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीतील ठळक १० क्षणांना उजाळा देऊया.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणूक निकालामुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल, कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर कराल?)

  • दोन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) नेतृत्व गुण ठळकपणे दिसले. भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तो होताच. पण, प्रत्यक्ष मैदानावरील त्याचं नेतृत्व जगाला दिसलं नव्हतं. पण, २०२२ च्या हंगामात नवीन प्रवेश झालेल्या गुजरात टायटन्स संघाचा तो कर्णधार होता. आणि नवोदित संघाला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून देण्याची कामगिरी हार्दिकने करून दाखवली. खुद्द हार्दिकने बॅटने कमाल दाखवताना ४७३ धावाही जमवल्या.
  • टी-२० प्रकारात हार्दिकचं कौशल्य विशेष उठून दिसतं. आणि त्याने तशी कामगिरीही करून दाखवली आहे. एकाच सामन्यात अर्धशतक आणि गोलंदाजीने ४ बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. भारताकडून ही सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी आहे. इंग्लंड विरुद्ध साऊदॅम्पटनमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडचा ५० धावांनी पराभव केला होता.
  • २०१६ च्या टी-२० विश्वचषकात बांगलादेश विरुद्धचा सामनाही हार्दिकने आपल्या अष्टपैलू कामगिरीने गाजवला होता. अटीतटीच्या त्या लढतीत शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिकवर आली. आणि त्याने लागोपाठच्या दोन चेंडूंवर बळी मिळवत बांगलादेशचा पराभव नक्की केला. भारतीय संघाला त्या सामन्यात अवघ्या एका धावेनं विजय मिळाला होता.

(हेही वाचा – Mall Fire System : मालाड येथील मॉलची वीज आणि पाणी जोडणी तोडणार)

  • तर २०१७ च्या चॅम्पियन्स करंडक सामन्यात भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) ४२ चेंडूंत ७६ धावांची खेळी गाजली होती. तो मैदानावर असेपर्यंत भारताला विजयाची आशा होती. पण, अखेर भारताचा पराभव झाला.
  • एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेले फलंदाज सहसा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करू शकत नाहीत. फार कमी क्रिकेटपटू हे तीनही प्रकार चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. पण, हार्दिक त्याला अपवाद आहे. २०१७ साली श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेत हार्दिकने फलंदाजीनेही आपला ठसा उमटवला होता. यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी अपयशी ठरत असताना पांड्याने मधल्या फळीत येऊन भारतीय डाव तर सावरलाच शिवाय उपहारापूर्वीच म्हणजे दोन तासांत शतक झळकावलं होतं.
  • हार्दिकच्या बॅटमधून अशीच एक खेळी २०२१ च्या आयपीएल अंतिम फेरीत पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिकने ३४ चेंडूंत ९१ धावा केल्या होत्या. ९ षटकार आणि ८ चौकारांनी सजलेली ही खेळी त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केली होती. आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत आयपीएल करंडक विक्रमी पाचव्यांदा पटकावला होता.

(हेही वाचा – Wedding Gold Necklace Design : लग्नासाठी सोन्याचा हार घेत आहात ?, हे वाचा…)

  • हार्दिकने आपल्या फलंदाजीतील कामगिरीने कुंग – फू – पांड्या असं टोपणनाव मिळवलं आहे. ताकदीने फटके खेळताना प्रतिस्पर्धी गोलंदाजावर केलेला हल्ला हे त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. खासकरून ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर आणि ऑस्ट्रेलियातही त्याची कामगिरी चोख आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध हार्दिकने ७६ धावांत नाबाद ९२ धावा केल्या. १ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी त्याने केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात त्याने मदत केली. भारताने हा सामना आरामात जिंकला.
  • पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी इथं खेळताना हार्दिकने ७६ चेंडूंत ९० धावा केल्या. ४ षटकार आणि ७ चौकार त्याने लगावले होते. भारतीय संघासमोर विजयासाठी ३७५ धावांचं आव्हान होतं. आणि भारतीय संघ ९ बाद ३०४ धावा करू शकला. पण, हार्दिकने सातव्या क्रमांकावर येत दिलेली लढत सगळ्यांना लक्षात राहील.
  • भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात हार्दिकला दुखापत झाली. आणि त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. पण, त्यापूर्वी हार्दिक चांगल्या फॉर्ममध्ये होता. या स्पर्धेपूर्वी झालेल्या आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध त्याने ९० चेंडूंत ८७ धावा केल्या होत्या. ईशान किशनच्या जोडीने त्याने भारताला हा सामनाही जिंकून दिला होता.

२०१७ साली हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून भारतीय संघात आपली जागा पक्की केली. त्याला कारणीभूत ठरली ऑस्ट्रेलिया विरुद्धची त्याची ६६ चेंडूंत ८३ धावांची खेळी. या खेळी दरम्यान त्याने ५ षटकार आणि ५ चौकार लगावले. आणि कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढत त्याने भारतीय संघाला विजय पथावरही नेलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.