लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, ४ जून रोजी सुरू झाली आहे. मतमोजणीदरम्यान हिंसाचार होण्याची भीती निवडणूक आयोगाला आहे. यामुळे आयोगाने ७ राज्यांमध्ये केंद्रीय दल तैनात केले आहेत. आचारसंहिता हटवल्यानंतर केंद्रीय दल तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Loksabha Election 2024)
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी सोमवारी, ३ जून रोजी सांगितले की, निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार होऊ नये. हे लक्षात घेऊन आचारसंहिता उठल्यानंतरही आम्ही खबरदारीच्य उपाययोजना केल्या आहेत. हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्र आणि मणिपूरमध्ये केंद्रीय दल तैनात करण्यात आहे. (Loksabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर)
मतमोजणीच्या दिवसानंतर (4 जून) 15 दिवस आंध्र प्रदेश आणि बंगालमध्ये सैन्य तैनात राहील, असेही सीईसीने सांगितले. तर उत्तर प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात मतमोजणीनंतर दोन दिवस सैन्य तैनात राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community