Lok Sabha Election Live Update: बीडमध्ये चुरशीची लढत; पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर

678
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत Election Commission of Indiaकडून आढावा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत Election Commission of Indiaकडून आढावा

बीडमध्ये चुरशीची लढत सुरू असून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये सध्या शेवटच्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत.

उत्तर पश्चिम मुंबईत रविंद्र वायकर विजयी घोषित

उत्तर पश्चिम मुंबईत रविंद्र वायकर विजयी घोषित झाले आहे. फेरमतमोजणीनंतर अमोल किर्तीकर पराभूत झाले आहेत.

अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी 

अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे ३१ हजार ३३८ मतांनी विजयी झाले आहेत.

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडि आघाडीत अटीतटीची लढत

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा मोठा विषय ठरला तो अयोध्येतील राम मंदिर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्द्यावरच सभा गाजवल्या. राममंदिराच्या उद्घाटनामुळे त्यांना उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशभरात भाजपाला विक्रमी जागा मिळतील असा भाजपाचा अंदाज होता. मंगळवारी निवडणूक निकालापूर्वी ४०० जागांचा आकडा पार केल्याचीही चर्चा होती, मात्र जसजसे निकाल हाती आले, तसतसे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडि आघाडीत अटीतटीची लढत असल्याचे स्पष्ट झाले. निकालातील कलानुसार एनडीए बहुमत मिळवण्याच्या तयारीत असताना, भाजपा पक्ष एकटाच बहुमतासाठी गाठण्यात मागे राहिल्याचे चित्र आहे, याला मूळ कारण ठरलं ते सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील पक्षाची कामगिरी. राम मंदिर निर्णायक ठरेल या आशेने भाजपाने उत्तर प्रदेशात सर्व जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, निकाल चित्र जसेजसे स्पष्ट झाले तसतसे हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाण्यात नरेश मस्के यांना १ लाखापेक्षा जास्त आघाडी

ठाण्यात नरेश मस्के यांना १ लाखापेक्षा जास्त आघाडी आहे. त्यासाठी ठाण्याच्या जनतेचे मी आभार मानतो तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठाण्यात महायुतीचा भगवा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतो आहे. सर्वाधारण कार्यकर्त्याला आम्ही ठाण्यातून उमेदवारी होती. ठाण्यातील विकासाला जनतेने मतदान केलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाण्यात झालेला विकास आणि केलेलं काम, राज्यसरकारने केलेलं काम, मोदींचं १०वर्षांचं काम याची पोचपावती या विजयात मतदारांनी दिली आहे. ठाणेकरांनी त्यांची (ठाकरे गटाची) जागा त्यांना दाखवली आहे. ठाणेकरांनी त्यांचा कार्यक्रम केला आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो; कारण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. लवकरच एनडीएचं मोदींच्या सरकार बनेल, असेही ते म्हणाले.

अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीसाठी मुंबईच्या ६ मतदारसंघात अटीतटीची लढत निर्माण झाली, कारण ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून २ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबईतील ४ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील आघाडीवर आहेत.

अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. निलेश लंके १४ हजार ७९७ मतांनी आघाडीवर आहे.

मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. अवघ्या साडेचार हजारांच्या फरकाने त्यांनी भाजपाच्या उज्ज्वल निकम यांना हरवलंय. सकाळपासून उज्ज्वल निकमांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता होती; परंतु शेवटच्या टप्प्यांत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली.

पंकजा मुंडे ३० हजार ४६१ मतांनी आघाडीवर

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे ३० हजार ४६१ मतांनी आघाडीवर आहेत.

नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अजय राय यांच्यावर 1,52,513 मतांनी विजय मिळवला आहे. आता नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली

राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय, 16व्या फेरी अखेर मोठी मुंसडी

सुप्रिया सुळेंनी 16व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे आघाडीवर

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे ९६ हजार ९३४ मतांनी आघाडीवर आहेत.

भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे पिछाडीवर

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे ५ हजार ३०६ मतांनी पिछाडीवर आहेत.

नारायण राणेंची विजयी आघाडी, भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

नारायण राणेंची विजयाकडे वाटचाल होताच त्यांच्या पत्नी आणि आमदार पुत्र नितेश राणे यांचा विजयोत्सव पाहायला मिळाला. १२व्या फेरीनंतर 405524  मतांची आघाडी मिळाली आहे. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी ही तर सुरुवात आहे. यापुढे कोकणात भाजपाचे कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण दिसेल, अस विश्वास व्यक्त केला.

पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा विजयी

शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या ३ प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून ६३.९१ % मतदान झालं आहे. पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अॅक्शन मोडवर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. पवार यांनी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे तसेच ते चंद्राबाबू नायडू यांनाही संपर्क करू शकतात, अशी चर्चा व्यक्त होत आहे.

मुंबईतील उत्तर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल विजयी 

मुंबईतील उत्तर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विजय मिळवला आहे.त्यांना ३,६९,०७९ मते मिळाली आहेत.त्यांच्या विरोधात उभे असलेले कॉंग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना १,७५,५४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे १,९३,५३२ मतांनी गोयल विजयी झाले आहेत.

जयपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या मंजू शर्मा विजयी

जयपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या मंजू शर्मा विजयी झाल्या आहेत. त्यांना २ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत मंजू शर्मा यांनी ३३, १७६७ मतांवर विजय मिळवला होता. मंजू शर्मा यांनी कॉंग्रेसच्या प्रताप सिंह खाचरियावास यांचा पराभव केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा

लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.

उज्ज्वल निकम यांना २,४७,००८ मतं मिळाली

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली आहे. निकम यांना ५०,७८६ मतांची आघाडी मिळाली आहे, तर माजी आणि कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा मंत्री वर्षा गायकवाड पराभवाच्या छायेत आहेत.

उज्ज्वल निकम यांना २,४७,००८ मतं मिळाली आहेत. तर वर्षा गायकवाड यांना आतापर्यंत १ लाख ९३ हजार ५०५ मतं मिळाली आहेत.

बारामतीत सुप्रिया सुळे ४० हजार ४७ मतांनी आघाडीवर

महाराष्ट्रातील जनतेचा कौल एनडीएला की इंडि आघाडीला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे.देशात आतापर्यंत एनडीए २९२, तर इंडि आघाडीला २३३ मते मिळाली आहेत.

बारामतीत सुप्रिया सुळे ४० हजार ४७ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे ५ हजार ३०६ मतांनी पिछाडीवर आहेत. अपक्ष विशाल पाटील यांना १३व्या फेरीअखेर ५५,३१६ मतांची आघाडी आहे

लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांत अटीतटीची लढाई

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर विरोधकांच्या महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे, तर सत्ताधारी महायुतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या कलानुसार, महाविकास आघाडीला मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी सर्वच विभागांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सर्वच मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांत अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांतील मतांचा फरक ५०० ते १००० मतांपर्यंत आहे, तर काही ठिकाणी उमेदवारांनी ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य घेत विजयी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात MVAला ३१ जागांवर आघाडी असून ठाकरे १२, कॉंग्रेस ११, पवार ८ जागांवर पुढे ,सत्ताधारी महायुती १८ जागांवर आघाडीवर आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे दुपारी १२ वाजेपर्यंतचे कल हाती आले असून भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. स्मिता वाघ यांना २ लाख ८१ हजार २९७ मते मिळाली आहे. 1 लाख 20 हजार 987 मतांनी स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार हे पिछाडीवर आहेत. हा कल दुपारी १२ वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल. (Lok Sabha Election Live Update)

भाजपाचा (BJP) बालेकिल्ला म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाची (Jalgaon Lok Sabha Constituency) ओळख आहे. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार (karan Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. जळगाव लोकसभेसाठी यंदा एकूण ५७.७० टक्के मतदान झाले आहे.

जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वजन चांगले
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकीत तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी बंड पुकारले. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली. तसेच जळगाव मतदारसंघात जळगाव, चाळीसगावात भाजपचे आमदार आहेत. तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत.अमळनेरला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वजन चांगले असून त्यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली. (Lok Sabha Election Live Update)

 नवीन पटनायक यांच्या बीजेडी आणि भाजपाला ६२-८० जागा मिळण्याची अपेक्षा

लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीपेक्षा खूप पुढे आहे. एक्झिट पोलनेही यावेळी सरकार बदलण्याची शक्यता वर्तवली आहे. ५ एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार बनवताना दिसत आहे आणि दोनमध्ये सत्ताधारी वायएसआरसीपी सरकार बनवताना दिसत आहे.

त्याच वेळी, BJD ओडिशात आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे. मात्र, भाजपा सत्ताधाऱ्यांना तगडी स्पर्धा देत आहे. एक्झिट पोलमध्येही असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार, नवीन पटनायक यांच्या बीजेडी आणि भाजपाला ६२-८० जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

भाजपाला साथ देणाऱ्या राज्यांनी यंदा मात्र सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं 

गेल्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या राज्यांनी यंदा मात्र सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला ५ महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका दिसताना आहे. काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडि आघाडीनं या राज्यांमध्ये भाजपाला धक्का दिला आहे. भाजपाच्या जागा घटताना दिसत आहे. (Lok Sabha Election Live Update)

उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपानं ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह भाजपानं ६४ जागा खिशात घातल्या होत्या. समाजवादी पक्ष, बसपाच्या आघाडीला केवळ १५ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या घडीला भाजप ३७ जागांवर पुढे आहे. तर सपा ३३, काँग्रेस ७ जागांवर पुढे आहे. त्यामुळे इंडि आघाडी ४० जागी आघाडीवर आहे. देशातील मोठ्या राज्यात भाजपाला झटका बसताना दिसतोय. (Lok Sabha Election Live Update)

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस  

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी, (४ जून) जाहीर होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून उत्तर मुंबईत लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर पाच मतदारसंघांमध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा (North East Mumbai Loksabha) मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी तिसऱ्या फेरीअखेर 15,348 हजार मतांची आघाडी घेतली आहे. हा भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यापूर्वी किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांनी प्रतिनिधित्व केले होते. या मतदारसंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या मिहीर कोटेचा यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर संजय दिना पाटील हे सातत्याने आघाडीवर आहेत. भाजपने यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील उमेदवार बदलला होता. संजय दिना पाटील यांचा विजय झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का ठरु शकतो.

मुंबईतील इतर मतदारसंघांमध्ये स्थिती काय?
उत्तर मुंबई मतदारसंघ वगळता मुंबईतील अन्य मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबईत भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे तब्बल 38 हजार मतांची आघाडी आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर पिछाडीवर असून रवींद्र वायकर आघाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर आहेत, तर राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर असून भाजपचे उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत.

ईशान्य लोकसभा मतदारसंघातील पहिली फेरी
एकूण मिळालेली मते

नंदेश उपम – ३९०
मिहीर कोटेचा – १९१५८
संजय दिना पाटील – २४०८२
ईशान्य लोकसभा मतदारसंघातील पहिली फेरी
एकूण मिळालेली मते

नंदेश उपम – ३९०
मिहीर कोटेचा – १९१५८
संजय दिना पाटील – २४०८२

ईशान्य मुंबईतील दुसऱ्या फेरीची मते

संजय दिना पाटील – ५६०३२
मिहीर कोटेचा – ४३७४४

संजय दिना १२२८८ मतांनी आघाडीवर

ईशान्य मुंबई तिसऱ्या फेरीची मतं
संजय दिना पाटील – ६७७१७
मिहीर कोटेचा – ५६२२८

संजय दिना पाटील ११४८९ मतांनी आघाडीवर

ईशान्य
मुंबई
चौथी फेरी
संजय दिना पाटील – ८८४४५
मिहीर कोटेचा – ७३०९७

संजय दिना पाटील १५३४८ मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत

राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींमध्ये समावेश असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Election) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी मोठी आघाडी घेतली आहेत. तर भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) मात्र या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत. (Lok Sabha Election Result Counting)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्या फेरीअखेर दिसत आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: मुंबईत ६ जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?)

धाराशिव आणि नाशिक…
धाराशिवमध्ये ओमराजे ७३ हजार मतांनी आघाडीवर, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे ९४,००० मतांनी पुढे आहेत.

भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ची मतमोजणी मंगळवारी, ४ जून रोजी होत आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने हे थोड्याच वेळात कळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुरलीधर मोहोळ हे २६,७७२ मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकारवर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदारसंघांपैकी पुण्याच्या निकालाकडे सर्वांचच लक्ष आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने सुरू असल्याचं चित्र आहे.

भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितकडून वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभेच्या रिंगणात होते. त्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या पुणे लोकसभेत कोण बाजी मारणार हे अवघ्या काही वेळेत स्पष्ट होणार आहे.

पुणे लोकसभा मतदानाची टक्केवारी ५३.५४ – टक्के

वडगाव शेरी – ५१.७१ टक्के
शिवाजीनगर – ५०.६७ टक्के
कोथरूड – ५२.४३ टक्के
पर्वती – ५५.४७ टक्के
पुणे कॅन्टोन्मेंट – ५३.१३ टक्के
कसबा पेठ – ५९.२४ टक्के
पुण्यात एकूण ५३.५४ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात २०,६१,२७६ मतदारांपैकी ११,०३,६७८ पुणेकरांनी मतदान केलं आहे. त्यात १०, ५७,८७७ पुरुष मतदारांपैकी ५,८४,५११ म्हणजेच ५५.२५ टक्के एकूण पुरुषांनी मतदान केलं आहे. तर १०,०३,०७५ महिला मतदारांपैकी ५,१९,०७८ म्हणजेच एकूण महिलांपैकी ५१.७५ टक्के महिलांनी मतदान केलं आहे. इतर मतदारांपैकी (तृतीयपंथी) ३२४ पैकी ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभेच्या 542 जागांची मतमोजणी सुरू 

लोकसभेच्या 542 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजण्यात आल्या. आता ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू झाली आहे. येत्या ३ तासांत नव्या सरकारची भूमिका जवळपास स्पष्ट होऊ शकते. (Lok Sabha Election Live Update)

मंदिरांपासून पक्ष कार्यालयापर्यंत हवन-पूजा होत आहेत. काही ठिकाणी पुरी-भाजीपासून छोले-भटूरे आणि लाडूंची तयारी सुरू आहे. भाजप कार्यालयात पुरी आणि बुंदी बनवली जात आहे. (Lok Sabha Election Live Update)

राज्यातल्या महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत असून सकाळी 10 वाजेपर्यंतचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं दिसून आलं. राज्यातील अनेक दिग्गजांना सकाळी 10 वाजेपर्यंत मोठे धक्के बसल्याचं दिसून आलं. त्यामध्ये सुनेत्रा पवार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुडे, उदयनराजे आणि नवनीत राणा हे दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून आलं.

(हेही वाचा  – Lok Sabha Election Live Update: राज्यातील १० दिग्गजांना धक्के, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर जाणून घ्या)

राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

कोण पिछाडीवर कोण आघाडीवर? 

नवनीत राणा- भाजप 3,322 मतांनी पिछाडीवर
नारायण राणे – भाजप
सुधीर मुनगंटीवार- भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
सुनेत्रा पवार- राष्ट्रवादी
पंकजा मुंडे – भाजप
उदयनराजे- भाजप 27 हजार मतांनी पिछाडीवर
संजयकाका पाटील – भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
राम सातपुते- भाजप
रणजीत निंबाळकर- माढा

आढळराव पाटील- राष्ट्रवादी

रविंद्र धंगेकर – क़ॉंग्रेस

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.