- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सोमवारी टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेची एकूण बक्षिसाची रक्कम जाहीर केली आणि आतापर्यंतच्या सगळ्या स्पर्धांमध्ये ती सर्वोच्च असून एकूण बक्षिसाची रक्कम १ कोटी १२ लाख अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. विजेता संघ तब्बल २४.५ लाख अमेरिकन डॉलर इतकी रक्कम घरी नेणार आहे. क्रिकेटमधील सगळ्यात छोट्या प्रकारात २० संघ यंदा आमने सामने येत आहेत आणि २८ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. क्रिकेटमधील ही सगळ्यात जास्त चाललेली टी-२० विश्वचषक स्पर्धा ठरणार आहे. (T20 World Cup 2024)
ही आतापर्यंतची नववी टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा आहे आणि इथे विसाव्या क्रमांकावर राहिलेला संघही २ लाख अमेरिकन डॉलर घेऊन घरी जाणार आहे. उपविजेत्या संघाला १२.८ लाख अमेरिकन डॉलर मिळतील. तर उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचलेले इतर दोन संघ ७.८७ लाख रुपये खिशात टाकतील. (T20 World Cup 2024)
T20 WORLD CUP PRIZE MONEY:
Winner – 20.36cr.
Runner Up – 10.64cr.– 93.52CR WILL BE GIVEN BY THE ICC IN THE PRIZE MONEY OVERALL. 🤯🏆 pic.twitter.com/1CupQwSUzk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2024
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकाच्या न्यूयॉर्कमधील सामन्यांसाठी स्निपर्स तैनात)
गटवार साखळीनंतर दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेले पण, बाद फेरी न गाठू शकलेले ४ संघ ३.८२ लाख अमेरिकन डॉलरची कमाई करतील. तर ९ ते १२ व्या स्थानावर राहिलेले संघ २.४७ लाख रुपये घरी नेतील. १३ ते २० व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी २.२५ लाख रुपये मिळतील. (T20 World Cup 2024)
इतकंच नाही तर बाद फेरीच्या पूर्वी संघाने मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी त्या संघाला अतिरिक्त ३१,१५४ अमेरिकन डॉलर मिळतील. बाद फेरीत ही बक्षिसाची रक्कम आणखी वाढेल. या स्पर्धेत पहिल्या गटवार साखळीचे एकूण ४० सामने रंगणार आहेत. त्यानंतर सुपर ८ चे सामने होतील आणि त्यातून उपांत्य फेरीचे चार संघ ठरतील. हे दोन्ही सामने त्रिनिदाद अँड टोबॅगो इथं रंगणार आहेत. तर अंतिम सामना बार्बाडोसच्या किंग्सटन ओव्हलला होईल. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community