देशात लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल (Lok Sabha Election Result) समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल फोल ठरत आहेत. फक्त मुंबई आणि महानगरचा विचार करता 7 आणि 8व्या फेरीपर्यंत जे लिडिंग समोर आले, त्यावरून महाविकास आघाडीच्या पक्षांनी मोदींविरोधात काढलेल्या ‘फतव्या’चा परिणाम दिसून आला आहे. मुसलमानांनी मुस्लिम उमेदवारांवर बहिष्कार टाकून ‘मविआ’च्या उमेदवारांना मते दिली. मुसलमानांची मते एक गठ्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात फिरल्याचे समोर येत आहे.
निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उबाठासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुसलमान बहुल भागात उघड उघडपणे भाजपाच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन करत होते. त्यासाठी चक्क मशिदींमधून मुल्ला-मौलवींनी त्याप्रमाणे ‘फतवे’ काढले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी याचे परिणाम दिसून आले होते. त्यावेळी मुसलमानबहुल भागात मोठ्या संख्येने मतदार एक गठ्ठा बाहेर पडला. ज्यामुळे मुंबईसह महामुंबई भागात प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसोबत अपक्ष म्हणून मुसलमान उमेदवार होते, मात्र त्यांनाही मुसलमानांची मते न मिळता ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा Loksabha Election 2024 : राज्यातील १० दिग्गजांना मोठा धक्का; नवनीत राणा, पंकजा मुंडे पिछाडीवर)
भिवंडी लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत काँग्रेसच्या बाळ्या मामा यांना ९६ हजार ६९० मते मिळाली, त्यांना १३ हजार ३९३ चे लिडिंग दिसले, त्या ठिकाणी भाजपाच्या कपिल पाटील यांना ८३ हजार २९७ मते मिळाल्याचे दिसले. विशेष म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या मुमताज अब्दुल सत्तार अन्सारी यांना केवळ १ हजार ३६६ मते मिळाली होती, तर जहिद अन्सारी, खान महंमद, सायफन पठाण यांच्यासह ८ मुसलमान उमेदवार आहेत, त्या सर्वांना हजाराच्या आताच मते मिळाली होती. (Lok Sabha Election Result)
मुंबई दक्षिण मध्य
या मतदारसंघात उबाठाच्या अनिल देसाई यांना १ लाख ९९ हजार ७७ मते मिळाल्याचे दिसते, तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना १ लाख ८३ हजार ४९८ मते मिळाल्याचे दिसते. यात वंचितच उमेदवार अब्दुल खान यांना केवळ ८ हजार ४०९ मते मिळाली. विशेष म्हणजे याठिकाणी नोटाला ६ हजार ९२१ मते पडली, जी ठरवून मोदी विरोधात पडल्याचे दिसते. (Lok Sabha Election Result)
मुंबई उत्तर पूर्व
या मतदारसंघात उबाठाचे अमोल कीर्तिकर यांना १ लाख ४४ हजार १६४ मते पडली, तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना १ लाख ४३ हजार १८५ मते पडली. याही ठिकाणी वंचितचे परमेश्वर रणशूर यांना ६ हजार ४१७ मते मिळाली. या ठिकाणीही मुसलमान बहुल भागातील एक गठ्ठा मते उबाठाकडे गेल्याचे दिसून येत आले. विशेष म्हणजे याही ठिकाणी नोटाला ५ हजार मते पडली. (Lok Sabha Election Result)
Join Our WhatsApp Community