पश्चिम बंगालमध्ये भाजपची स्थिती चिंताजनक झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) बंगालमधील 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या होत्या. परंतु या वेळी आलेल्या अंदाजांनुसार भाजपचे उमेदवार आघाडीवर असलेल्या मतदारसंघांची संख्या यंदा घटली आहे. सध्याच्या मतमोजणीनुसार तृणमूल काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) 22 जागा जिंकल्या होत्या. ते सध्या 31 जागांवर आघाडीवर आहेत, भाजप १० जागांवर, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. बहरामपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसूफ पठाण (Yusuf Pathan) आघाडीवर आहेत.
एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे
एक्झिट पोलमध्ये या वेळी भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला 42 पैकी 26 ते 31 जागा मिळतील, असे वर्तवण्यात आले होते. या पोलमध्ये टीएमसीला 11 ते 14 जागा देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र ममता बॅनर्जी यांचाच बंगालमध्ये दबदबा असल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकांच्या पूर्वी बंगालमध्ये संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतरही बंगालच्या जनतेने तृणमूललाच मते दिल्याचे दिसून येत आहे. (Trinamool Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community