४ जून रोजी नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात सुखोई – 30 (Sukhoi – 30) विमान कोसळले आहे. या घटनेत दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: रायगडमध्ये कुणाचे पारडे जड? तर काय सांगते आकडेवारी? )
यासंबंधीच्या वृत्तानुसार, निफाड तालुक्यातील शिरसगाव येथीस एका शेतात हे लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. या विमानात 2 वैमानिक होते. त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर उडी मारल्यामुळे ते वाचले. हे दोघे वैमानिक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे विमान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. या अपघाताची माहिती मिळताच एचएएलच्या येथील टीमने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातामुळे शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community