१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरू होऊन जवळजवळ पाच तास होत आले आहेत. यामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगीत लढत अजूनही सुरू आहे. दरम्यान, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. तर या निवडणुकीच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात देशातील काही उमेदवरांना अपेक्षित यश मिळाले आहे तर काही उमेदवारांना मोठा लीड मिळाला आहे. देशातील ज्या उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळले अशा उमेदवारांविषयी जाणून घेऊया. देशातील या लाखमोलाच्या उमेदवारांवर एक नजर टाकू या. (Lok Sabha Election Result 2024)
दरम्यान, लोकसभा आयोगाच्या वेबसाईटवर सातत्याने मतदानाच्या आकडेवारीत बदल होत आहे. या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये , दुपारी ०३ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार लाखापेक्षा अधिक लीड घेतलेल्या उमेदवारांच्या मतांची माहिती देण्यात आली आहे.
श्रीकांत शिंदे – ठाणे लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. शिंदे 405187 मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये कल्याणची ही जागा ठाकरे गटाकडे आली आणि त्यांनी वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती.
राजाभाऊ वाजे – नाशिक लोकसभा मतदारसंघ
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ( ठाकरे गट ) राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. व्या फेरी अखेर वाजे यांनी घेतली 205109 आघाडी घेतली आहे. राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय निश्चित आहे.
गोवल पाडवी – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ (Nandurbar Loksabha)
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला असून नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. गोवाल पाडवी हे तब्बल 629157 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिला विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना 18 व्या फेरीअखेर 1लाख 40 हजार मतांनी पिछाडीवर आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी)
पीयूष गोयल – उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल 460380 मतांनी मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर काँग्रेस भूषण पाटील हे 2 लाख 77 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
प्रतिभा धानोरकर – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तीन पर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 429782 मतांनी आघाडीवर आहे.
ओमराजे निंबाळकर – धाराशिव लोकसभा मतदारसंघ
उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरली. लोकसभा मतदारसंघाचे पहिले कल हाती आले असून तीन वाजेपर्यंतचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community