नरेंद्र मोदींविरोधात जनतेने दिलेला जनादेश हा त्यांचा नैतिक पराभव; Mallikarjun Kharge यांचा हल्लाबोल

177
नरेंद्र मोदींविरोधात जनतेने दिलेला जनादेश हा त्यांचा नैतिक पराभव; Mallikarjun Kharge यांचा हल्लाबोल
नरेंद्र मोदींविरोधात जनतेने दिलेला जनादेश हा त्यांचा नैतिक पराभव; Mallikarjun Kharge यांचा हल्लाबोल

आज आलेले निकाल हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, आम्ही आधीच म्हणत होतो की, ही लढाई मोदी विरुद्ध जनता आहे. या वेळी जनतेने कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत दिले नाही, सत्ताधारी पक्ष भाजपने एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मते मागितली. आज हे स्पष्ट झाले आहे की हा जनादेश नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात आहे, हा त्यांचा नैतिक पराभव आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केला. लोकसभा निवडणुकांमध्ये (Loksabha Election 2024) इंडि आघाडीला २०० हून अधिक जागा मिळतील, असे आकडेवारीतून दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मरगळलेल्या काँग्रेसनेही यंदाच्या निवडणुकीत उभारी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने दिल्ली येथील मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजप आणि महायुती यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: जालोरमध्ये कॉंग्रेसला धक्का! अशोक गहलोतांच्या मुलाचा २ लाख मतांनी पराभव )

त्यांनी स्वतःच्या नावे मते मागितली…

या वेळी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) पुढे म्हणाले की, राहुल यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समस्या समजून घेतल्या. काँग्रेस पक्ष आणि आमच्या इंडिया आघाडीने अत्यंत प्रतिकूल वातावरणात निवडणूक लढवली. आमची खाती जप्त करण्यापासून ते अनेक नेत्यांच्या विरोधात मोहीम चालवण्यापर्यंत गोष्टी झाल्या. आमची मोहीम सकारात्मक होती. महागाई, बेरोजगारी आणि कामगारांच्या समस्यांना आम्ही मुद्दा बनवले. त्यामुळे लोक आमच्यात सामील झाले. पंतप्रधानांनी राबवलेली मोहीम इतिहासात स्मरणात राहील. त्यांनी स्वतःच्या नावे मते मागितली. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पसरवलेले खोटे जनतेला समजले.

लोकांनी चमत्कार केला – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक इंडि आघाडी आणि काँग्रेस यांनी केवळ एका राजकीय पक्षाविरुद्ध लढवली नाही, तर ही निवडणूक भाजप, सी.बी.आय, ई.डी. या सर्वांनी लढवली होती; कारण या संस्थांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी धमकावले होते. हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता. लोकांनी चमत्कार केला. संविधान वाचवण्याचे काम भारतातील गरीब लोकांनी केले आहे. त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासवर्गियांनी संविधान वाचवण्यासाठी हे काम केले आहे.

सरकार स्थापन करण्याच्या चर्चांविषयी राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे इंडि आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांसोबत बैठक घेणार आहोत. याबद्दल काही नंतर सांगितले जाऊ शकते. आम्हाला आमच्या सहकारी पक्षांशी बोलल्याशिवाय यावर कोणतेही विधान करायचे नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.