Loksabha Election 2024 : लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केल्या भावना

या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची (Loksabha Election 2024) कसर व्याजासह भरून काढू, अशा भावना Devendra Fadnavis यांनी व्यक्त केल्या आहेत.

297
पुण्यासह राज्यातील बार-पबमध्ये 'ए आय' कॅमेरे, Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सांगितले...
पुण्यासह राज्यातील बार-पबमध्ये 'ए आय' कॅमेरे, Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सांगितले...

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. मात्र, निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची (Loksabha Election 2024) कसर व्याजासह भरून काढू, अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व्यक्त केल्या आहेत.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : काश्मिरी जनतेने फुटीरतावाद्यांना नाकारले; Omar Abdullah, Mehbooba Mufti यांचा पराभव)

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला महाराष्ट्रात (Maharashtra) जेमतेम १० जागा मिळाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत कसर भरून काढणार असल्याचे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, जनादेश शिरसावंद्य

पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो ! इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

… तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो ! (Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.