Lok Sabha Election Result 2024 : मोदींचा रोड शो आणि राज ठाकरेंच्या शाखा भेटीनंतरही कोटेचांचा पराभव

221
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचा रोड शो आणि राज ठाकरेंच्या शाखा भेटीनंतरही कोटेचांचा पराभव
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कापून मुलुंडमधील आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आधीच पक्षांतर्गत काही प्रमाणात असलेली नाराजी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार संजय दिना पाटील यांना मुस्लिम मतदारांनी हातभार दिल्याने कोटेचा यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या मतदार संघात मराठी आणि अमराठी मुद्दा पेटलेला असतानाच हिंदु आणि मुस्लिम समाजातील मुद्दा आदींमुळे कोटेचा यांच्या मतदानावर परिणाम झाला आहे. या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा रोड शो पार पडला होता आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मतदार संघातील मनसेच्या शाखा शाखांना भेटी देत मनसैनिकांना मतदानासाठी प्रेरित केले होते. परंतु मोदी आणि राज ठाकरे यांच्या रोड शो नंतरही कोटेचा यांचा पराभव झाल्याने मुंबईतील या मतदार संघातील पराभव भाजपाचा मोठा पराभव मानला जात आहे. (Lok Sabha Election Result 2024)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्यावतीने मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना आणि उबाठा शिवसेनेच्यावतीने संजय दिना पाटील हे निवडणूक रिंगणात होते. परंतु कधी संजय दिना पाटील तर कधी कोटेचा हे आघाडीवर आणि पिछाडीवर राहिले होते. परंतु शेवटच्या फेरी अखेर संजय पाटील हे ४ लाख ५० हजार ९३७ मते मिळवत सुमारे ३० हजार मतांनी विजय प्राप्त केला. भाजपाचे मिहिर कोटेचा यांना केवळ ४, २१, ०७६ एवढी मते मिळाली. परंतु उमेदवार बदल्याने हा परिणाम दिसून आल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली असती तर ईशान्य मुंबईचा गड भाजपाला राखता आला असता, असे दिसून येत आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचा भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकणार; PM Narendra Modi यांची घोषणा)

या मतदार संघात कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मराठी आणि अमराठी मुद्दा पेटला होता. त्यातच कोटक यांना डावलून कोटेचा यांना उमेदवारी दिल्याने याचा परिणाम मंगळवारी पराभवात दिसून येत आहे. त्यातच हिंदु मुस्लिम मतांची विभागणी करण्यासाठी मोदी यांच्या विरोधात मुस्लिमांना एकाबाजुला करण्यात आले. या मुस्लिमांना मोदी विरोधात मतदान करण्यासाठी मदरसे आणि मस्जिद मधून फतवे काढले गेले, त्यातच कोटेचा यांनी मानखुर्द शिवाजी नगरमधील गर्दुल्ल्यांचे अड्डे नष्ट करणार असा आवाज उठवला. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. (Lok Sabha Election Result 2024)

या मतदार संघातील शिवाजी नगर मानखुर्द विधानसभा मतदार संघातून कोटेचा यांना केवळ २८, १०१ मते मिळाली, तर संजय पाटील यांना १, १६,०७२ मते मिळाली. तर मुलुंडमधून कोटेचा यांना १, १६,४२१ मते मिळाली तर संजय पाटील यांना ५५,९७९ एवढी मते मिळाली. त्यामुळे मुलुंडमधून जर संजय पाटील यांना रोखता आले असते आणि घाटकोपर पश्चिम मध्ये अधिक मतधिक्य घेतले असते तर कोटेचा यांचा विजय सुकर झाला असता. घाटकोपर पश्चिम हा भाजपाचा गड असतानाही कोटेचा यांना केवळ ६३, ३७० मते मिळाली तर संजय पाटील यांना ७९,११७ एवढी मिळाली. म्हणजे घाटकोपर पश्चिम मधून संजय पाटील यांनी कोटेचा यांच्या पेक्षा सुमारे १५ हजार ७४७ मतांची आघाडी घेतली. म्हणजेच भाजपाचा गड असलेल्या घाटकोपर पश्चिममध्ये जिथे कोटेचा यांना अधिकची मते मिळणे आवश्यक होते, तिथे संजय पाटील यांना अधिक मते मिळाली. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही वंचितचे उमेदवार दौलत कादर खान यांना केवळ १४,६५७ मध्येच मिळवता आली यांच्याकडून किमान ६० ते ७० हजार मत मिळवणे आवश्यक होते. ही मत मुस्लिमांची राहिली असती, आणि याचा परिणाम कोटेचा यांच्या विजयात दिसून आला असता, असेही बोलले जाते. घाटकोपर पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर कोटेचा यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. यासाठी मेट्रो रेल्वे सेवा बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा जनप्रक्षोप वाढला आणि याबाबत संपूर्ण मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली होती. मोदी यांच्या रोड शोमुळे कोटेचा यांच्या मतांमध्ये वाढ होण्याऐवजी या रॅलीमुळे लोकांना झालेल्या त्रासाचा परिणाम त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला. त्यामुळे मोदींचा रोड शो कोटेचा यांच्यासाठी फायदेशी ठरला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठी व अमराठी मुद्दा पेटल्याने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रोळी, घाटकोपर, भांडुपमधील मनसे शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम केले. परंतु राज ठाकरेंच्या रोड शोचा परिणाम दिसून आला नाही. (Lok Sabha Election Result 2024)

विक्रोळी विधानसभा क्षेत्रात कोटेचा यांना ५२,८०७ मते तर संजय पाटील यांना ६८,६७२ मते मिळाली आणि भांडुप विधानसभा क्षेत्रात कोटेचा यांना ७५,६५९ मते आणि संजय पाटील यांना ७९,११७ मते मिळाली. केवळ घाटकोपर पूर्वमध्ये कोटेचा यांना ८३,२३१ मते पडली तर संजय पाटील यांन ४९,६२२ मते मिळाली. त्यामुळे पाटील यांना भाजपाच्या गडातही चांगली मते मिळाली असून संजय पाटील यांनी स्वत:च्या पक्षातील दोन आमदारांसह सपाच्या आमदारांच्या मतदार संघात अधिक मते घेतानाच भाजप आमदारांच्या मतदार संघातही बाजी मारल्याने कोटेचा हे विजयापासून खूप दूर निघून गेले. (Lok Sabha Election Result 2024)

  • मिहिर कोटेचा, भाजपा : ४, १९,५८९
  • संजय पाटील, उबाठा शिवसेना : ४,४८,६०४
  • दौलत कादर खान : १४,६५७
  • नंदेश उमप, अपक्ष : ८,२१७
  • नोटा : १०,१७३ (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.