Lok Sabha Results 2024 : निकालाआधीच उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने

400
Lok Sabha Results 2024 : निकालाआधीच उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने

लोकसभा निवडणुकीचे घोषित होण्यापूर्वीच मंगळवारी (४ जून) ला सायंकाळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कडबोळ्याच्या आधारावरील सरकारमध्येही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडण्यास सुरुवार झाली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यासाठी उद्या ५ जूनला दिल्लीला जाणार असल्याचे जाहीर करून टाकले. (Lok Sabha Results 2024)

ठाकरे बुधवारी दिल्लीला

उद्या बुधवारी दिल्लीला इंडी आघाडीची बैठक होणार असून केंद्रात सत्तेसाठी इंडी आघाडीने दावा करायला हवा, असे ठाकरे म्हणाले. तसेच उद्या इंडी आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडला जाणार असून प्रवक्ते संजय राऊत, अनिल देसाई पुढे जातील आणि आपण संध्याकाळी जाऊ, असे ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा त्यांच्या चेहेऱ्यावरून लपून राहिली नाही, अशी चर्चा पत्रकारांमध्ये होत होती. (Lok Sabha Results 2024)

इंडी आघाडीचे वकीलपत्र

ठाकरे यांनी इंडी आघाडीचे वकीलपत्र घेतल्यासारखे, भाजपासोबत ‘एनडीए’मध्ये असलेल्या चंद्राबाबू नायडू तसेच नितीश कुमार यांच्यावरदेखील प्रतिक्रिया देताना नायडू आणि नितीश कुमार यांचा मोदी सरकारने छळ केल्याचा दावा ठाकरे यांनी केला. त्यामुळे ते आपल्याला पाठींबा देतील, असे सांगितले. सत्ता स्थापन करण्यासाठी इंडी आघाडी सर्व लहान घटक पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचाही छळ झाला असून त्या आमच्यासोबत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. (Lok Sabha Results 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024 : मोदींचा रोड शो आणि राज ठाकरेंच्या शाखा भेटीनंतरही कोटेचांचा पराभव)

उत्तर-पश्चिम पराभव ठाकरे यांच्या जिव्हारी

मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अत्यंत कमी मतांनी झालेला पराभव ठाकरे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले. या निकालाला आव्हान देणार असल्याचे ठाकरे यांची सांगितले. (Lok Sabha Results 2024)

निम्या जागा कमी, तरी आनंद

ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने भाजपासोबत असताना २०१४ आणि २०१९ मध्ये १८-१८ लोकसभा जागा जिंकल्या होत्या. आता पक्ष फूटला आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला २१ पैकी ९ जागांवर आघाडी मिळाली तरी आनंदाच्या उकळ्या फूटत आहेत. आज ४ जूनला सायंकाळी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आनंदित स्वरात ठाकरे यांनी इंडी आघाडीने केंद्रात दावा करायला हवा, असे मत व्यक्त केले. (Lok Sabha Results 2024)

सांगलीवरून भविष्य कठीण

सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी शिवससेना उबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा ५ लाख मतांच्या फरकाने पराभव केला याबाबत ठाकरे म्हणाले की सांगलीत आघाडीचा धर्म पाळला की नाही ते दिसून येत आहे. तर सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाठा यांच्यात भविष्यात फार सख्य राहील, असे दिसत नाही. (Lok Sabha Results 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.