प्रचंड उकाड्यापासून बुधवारी सकाळीच मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईतील दादर परिसरात सकाळी सव्वासात वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दादर, परेल आणि माहीम भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मंगळवारी ठाण्यातही पाऊस पडला होता आणि बुधवारी मुंबईतील दादर, परेल, प्रभादेवी आणि माहीम भागांत सकाळीच पावसाने हजेरी लावली. ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळू लागला. (Mumbai Rain)
गेल्या काही दिवसांत प्रचंड उकाडा वाढला होता आणि अशातच पाऊस कधी येणार, याची चातकासारखी वाट लोकं बघत होते. त्यातच बुधवारी दादर, परेल, प्रभादेवी आणि माहीम भागांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या शिवाय कोकण पट्ट्यात ढगाळ वातावरण आहे. तब्बल अर्धा तास या परिसरात पाऊस पडत होता. लवकरच मान्सूनला सुरुवात होईल त्याआधी पडलेला हा पूर्वमोसमी पाऊस आहे.
(हेही वाचा – Sunetra Pawar: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची ‘ती’ पोस्ट!)
ठाणे, पालघर, जोगेश्वरी भागांतही पाऊस
हवामान विभागानेही येत्या ४८ तासांत पाऊस पडेल, असं म्हटलं होतं. ज्यामध्ये कोकण, उत्तर कोकण या ठिकाणांचा समावेश होता. मुंबईत अवकाळी पावसानंतर सकाळी पाऊस पडण्याआधी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. काहीजण आधीच घराबाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडले, तर पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही काहीजणांनी घेतला. मुंबईच्या उपनगरीय भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, जोगेश्वरी या भागांतही ४८ तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community