Lok Sabha Election 2024 : कोकणातून ठाकरे शिवसेना हद्दपार…!

229
Lok Sabha Election 2024 : कोकणातून ठाकरे शिवसेना हद्दपार...!
Lok Sabha Election 2024 : कोकणातून ठाकरे शिवसेना हद्दपार...!

….. काय बातमीचे शीर्षक वाचून चमकलात ना.. पण होय पालघर, ठाणे, कल्याण, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या कोकण पट्ट्यावर घट्ट मांड ठोकून बसलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची पकड तिथल्या स्थानिक मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पार उध्वस्त केल्याने कोकणातून शिवसेना हद्दपार झाल्याचे विदारक दृश्य यंदा पहिल्यांदाच पाहावयास मिळाले.

तर नेहमीच निवडणूकीत पराभव पदरी पडलेल्या भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सलग दोन वेळा निवडून येवून खासदार बनलेल्या ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना तब्बल २० हजार मतांनी पराभूत करून त्यांच्या विजयाच्या वारुला वेसण घालत पहिल्यांदाच कोकणातल्या ठाकरे गटाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रत्नागिरी सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत येथे भाजपाचा झेंडा तर फडकावलाच पण पराभवाची परंपराही मोडीत काढली.

(हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; ‘या’ भागांत मुसळधार पावसाच्या सरी)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) वेळी झालेल्या प्रचारात या पाचही मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमूख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्याप्रकारे खालच्या पातळीवर उतरून प्रचार केला तो या प्रचारवेळीच स्थानिक मतदारांच्या नजरेतून उतरल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आणि प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर विद्यमान ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत राजापूर, व रत्नागिरीच्या काही हायप्रोफाइल मतदार संघात एक प्रकारची सुप्त चीड जाणवत होती.त्याचवेळी येथील मतदारांनी ठरवले होते की,काहीही न बोलता मतपेटीतून आपला राग व्यक्त करत खा.राऊत यांना त्यांची खरी लायकी काय ती दाखवून द्यायची. आणि झाले ही तसेच राऊत यांना घरी बसवून मतदारांनी त्यांना त्यांची लायकी दाखवून दिल्याचेही येथील राजकीय वर्तुळाचा कानोसा घेतला असता प्रकर्षाने दिसून आले. मात्र हा मतदारसंघ ठाकरे यांची शिवसेनाच राखणार यासाठी तगडा सट्टा लावणारे व भले भले राजकीय पंडितांचे मात्र राणे यांच्या विजयाने दात घशात घातल्याचेही मानले जाते.

(हेही वाचा – Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली)

जी गत रत्नागिरी सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघाची तीच गत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजपर्यंत गड मानले जाणाऱ्या ठाणे या लोकसभा मतदारसंघाची मानली जाते. ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खा.असलेले राजन विचारे यांनी ही निवडणूक फार हलक्यात घेतली आहे असे सुरुवातीपासूनच दिसत होते. त्याला कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर व त्यांचे खास विश्वासू समजले जाणारे अगदीच नवखे नरेश म्हस्के यांना या निवडणूकीत विचारे यांच्या विरोधात उतरवले. मात्र म्हस्के आपले काही वाकडे करू शकणार नाहीत व विजय माझाच आहे या भ्रमात वावरणारे राजन विचारे यांच्या भ्रमाचा भोपळा या मतदार संघात येणाऱ्या ऐरोलीचे भाजपाचे आमदार व ज्येष्ठ नेते गणेश नाईक, बेलापूरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे, मिरा भाईंदर चे आजी आमदार व भाजपा समर्थक गीता जैन, ओवळा माजिवडा चे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, आदी प्रमूख नेत्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे फोडण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना बऱ्यापैकी यश आल्याचे मानले जाते.मात्र म्हस्के यांच्या विजयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची निवडणूक चाण्यंक नीती कामी आली हेही मान्य करावेच लागेल. कारण उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सहीत ठाकरे गटाचे जे फायर ब्रँड प्रचारक नेते होते त्यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी जंग जंग पछाडले होते.मात्र एवढे सर्व करूनही शिंदे शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचा हा अफलातून कारण तब्बल २ लाख मतांच्या आघाडीने विजय हा भल्या भल्या राजकीय चाणक्यांना व सत्तेबाजाराला तोंडात बोट घालणारा असणार यात शंकाच नाही. मात्र एक खरे की कधी काळी याच कोकण पट्ट्यावर एकाच्छत्री आपला दारारा राखणाऱ्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा पार कपाळमोक्ष झालेला स्पष्ट व ठळकपणे दिसला असून आता उध्दव ठाकरे यांची शिवसेना कोकणातून हद्दपार झाल्याचे पाहावयास मिळत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.