राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या १६ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण त्यातील ७ जण जिंकले आणि ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला. खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील. (Lok sabha Election 2024)
राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केला, पण ते रामटेकमध्ये पराभूत झाले. त्यामुळे आता ते विधानसभेचेही सदस्य नसतील, तसेच नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला व विजय मिळविला. (Lok sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election Results: अधीर रंजन चौधरीपासून ओमर अब्दुल्लापर्यंत ‘या’ मोठ्या नेत्यांना मिळाली हार! )
१. सुधीर मुनगंटीवार – पराभूत
२. प्रतिभा धानोरकर – विजयी
३. राजू पारवे – पराभूत
४. विकास ठाकरे – पराभूत
५. बळवंत वानखेडे – विजयी
६. राजेश पाटील – पराभूत
७. महादेव जानकर – पराभूत
८. शशिकांत शिंदे – पराभूत
९. रवींद्र वायकर – विजयी
१०. वर्षा गायकवाड – विजयी
११. मिहिर कोटेचा – पराभूत
१२. यामिनी जाधव – पराभूत
१३. संदीपान भुमरे – विजयी
१४. नीलेश लंके – विजयी
१५. प्रणिती शिंदे – विजयी
१६. राम सातपुते – पराभूत
हेही पहा –
Join Our WhatsApp Community