“माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र…”, पराभवानंतर Pankaja Munde नेमकं काय म्हणाल्या?

458
"माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र...", पराभवानंतर Pankaja Munde नेमकं काय म्हणाल्या?

यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024 Result) चांगलीच चुरशीची ठरली. महाराष्ट्रातील जनतेने यावेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकली. या निवडणुकीत बीड या मतदारसंघात सर्वाधिक अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचा विजय झाला. पराभवानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता. माझ्या आयु्ष्यात पहिल्यांदा माझ्या जमावाने कारच्या काचांना बुक्क्या मारल्या. मी विजय, पराभव सगळं पाहिलेलं आहे. पण बीड जिल्ह्यात मी असं कधी पाहिलं नाही. हेच थोडं अस्वस्थ करणारं आहे. (Pankaja Munde)

त्यांना विजय पचवता आला पाहिजे

त्यांना विजय पचवता आला पाहिजे. त्यांच्या विजयामध्ये कोणाचं योगदान आहे, कोणत्या विषयांचं योगदान आहे हा वेगळा विषय आहे. मला या जिल्ह्याची काळजी वाटत होती. आता बघू आमच्या आयुष्याच्या वाट्याला, अनुभवाला काय काय येतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde)

बीडमध्ये कोणाला किती मतं मिळाली?

बजरंग सोनवणे (शरद पवार गट)- 6 लाख 83 हजार 950 मते
पंकजा मुंडे (भाजप)- 6 लाख 77 हजार 397 मते
अशोक हिंगे (वंचित)- 50 हजार 867 मते

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.