- ऋजुता लुकतुके
नॉर्वे क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रग्यानंदा अव्वल बुद्धिबळपटूंना धक्क्यावर धक्के देत आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्याने माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनला हरवलं होतं. त्यानंतर पाचव्या फेरीत त्याने कारुआनाला हरवलं. आणि आता तर चक्क चिनी जगज्जेता डिंग लिरेनला त्याने पराभवाची चव चाखली आहे. क्रमवारीत आपल्यापेक्षा कितीतरी वर असलेल्या खेळाडूंना हरवण्याची परंपरा प्रग्यानंदाने कायम राखली आहे. (R Praggnanandhaa)
स्वत: प्रग्याही या विजयामुळे जागतिक क्रमवारीत पहिल्या दहांत पोहोचला आहे.
GM Praggnanandhaa Rameshbabu beat World No.1 Magnus Carlsen and World No.2 Fabiano Caruana in their classical games, and now he beat the World Champion Ding Liren in their Armageddon game! WHAT A PERFORMANCE by the Indian prodigy 🔥🔥 #norwaychess pic.twitter.com/VNIcduLUh4
— Norway Chess (@NorwayChess) June 3, 2024
(हेही वाचा – Yusuf Pathan : डावखुरा आक्रमक फलंदाज युसुफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर)
प्रग्या आणि डिंग लिरेन यांच्यातील सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकर खेळवण्यात आला आणि तिथे प्रग्याने कठीण चाली रचत लिरेनला जेरीला आणलं. सुरुवातीलाच लिरेनकडून झालेल्या चुकीचा फायदा उचलत प्रग्याने हा सामना जिंकला. स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार, ६ अव्वल खेळाडूंमध्ये प्रत्येकी दोनदा सामने होणार आहेत. यात कार्लसन, कारुआना आणि डिंग लिरेन यांच्याविरुद्ध प्रग्याने विजय मिळवला असला तरी इतर दोन सामने त्याने गमावले आहेत. आता परतीचे सामने सुरू होतील आणि यात त्याची गाठ पुन्हा एकदा मॅग्नस कार्लसनवर असेल. (R Praggnanandhaa)
प्रग्यानंद विरुद्ध कार्लसन या लढतीवर पुन्हा एकदा बुद्धिबळ जगताचं लक्ष लागलं आहे. लिरेन विरुद्धच्या विजयामुळे प्रग्याचे ११ गुण झाले असून तो आता तिसऱ्या स्थानावर आहे. तर मॅग्नस कार्लसन पहिल्या आणि हिकारु नाकामुरा दुसऱ्या स्थानावर आहे. डिंग लिरेनची स्पर्धेत कामगिरी अत्यंत सुमार असून फक्त साडेतीन गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. डिंग लिरेन या स्पर्धेनंतर भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशबरोबर जगज्जेतेपदाची लढत खेळणार आहे. पण, लिरेन सध्या स्पर्धात्मक बुद्धिबळापासून दूर आहे. त्याच्या खेळातूनही ते प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे आगामी जगज्जेतेपदाच्या लढतीवरही सगळ्यांचं लक्ष असेल. (R Praggnanandhaa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community