- ऋजुता लुकतुके
पाकिस्तान क्रिकेट आणि वाद यांचं नातं अगदीच जुनं आहे आणि पिढी बदलली तरी वाद सुरूच राहतात. आता टी-२० विश्वचषक (T20 World Cup) खेळण्यासाठी अमेरिकेत असलेल्या पाकिस्तान संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी क्रिकेटपटू रशिद लतिफनेही तो शेअर केला आहे. यात पाकिस्तानी खेळाडू न्यूयॉर्कमध्ये चक्क खाजगी पार्टी आयोजित करताना दिसत आहेत. इथं पाक खेळाडूंबरोबर जेवण करण्यासाठी लोकांकडून प्रत्येकी २५ डॉलर इतकं शुल्क आकारण्यात येत होतं. (Pakistan Dinner Party)
रशिद लतिफ एका टॉक शोमध्ये या डिनर पार्टीविषयी बोलत आहे. त्याच्यासोबत इथं शोचा होस्ट कामरान मुझफ्फर आहे. तर नौमन नियाझ हा पाकिस्तानातील क्रीडापत्रकारही या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. लतिफ आणि नियाझ यांना ही डिनर पार्टी रुचलेली नाही. (Pakistan Dinner Party)
लतिफ या शोमध्ये म्हणतो, ‘दौऱ्यावर खेळाडूंसाठी अधिकृतपणे अशी पार्टी आयोजित केली जाते. पण, ही खाजगी होती. कोण करतं असं? क्रिकेटपटू इतके स्वस्त आहेत का, की २५ डॉलरमध्ये त्यांना भेटा आणि तिथे काहीतरी झालं असतं तर?’ यावर नौमन नियाझही रशिद लतिफच्या बाजूने बोलताना दिसतो. ‘तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करत असताना असले उद्योग नाही करू शकत. पाक क्रिकेटमध्ये काहीतरी भयानक चुकीचं घडतंय. पाक संघ तिथे नक्की कशासाठी गेलाय?’ असा प्रश्न नियाझ विचारताना दिसतात. (Pakistan Dinner Party)
Let’s Save The Star & Be Stars
Unofficial Private Dinner During WC24#T20WorldCup pic.twitter.com/BXEgPyA2p2— Rashid Latif | 🇵🇰 (@iRashidLatif68) June 4, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा!)
लतिफने सध्याच्या संघाविषयी आणखी एक निरीक्षण सांगितलं. ‘मला कित्येकांनी हे सांगितलं आहे. पाक खेळाडू दौऱ्यावर असले आणि स्थानिक लोकांनी कुठल्याही कार्यक्रमासाठी खेळाडूंना बोलवलं. तर ते इतकंच विचारतात की. पैसे किती मिळणार? खेळाडूंनी २०-२५ डॉलरसाठी असं स्वत:ला विकू नये,’ असं रशिद म्हणतो. (Pakistan Dinner Party)
पाक क्रिकेट सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे आणि पाक मंडळाकडे दौरे आखण्यासाठीही पैसे नाहीएत. परदेशी संघांनी पाकमधील दहशतवादी हल्ल्यांची भीती घेऊन आपले संघ पाकिस्तानमध्ये पाठवणं जवळ जवळ बंद केलंय. टी-२० विश्वचषकात पाक संघाचा पहिला सामना गुरुवारी यजमान अमेरिकेशी होणार आहे आणि त्यानंतर ९ जूनला भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक संघ आमने सामने येणार आहेत. (Pakistan Dinner Party)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community