Intelligence Survey Report ठरला ‘परफेक्ट’; ‘हिंदुस्थान पोस्ट’ने निकालापूर्वी दिले होते वृत्त

205
Intelligence Survey Report ठरला 'परफेक्ट'; 'हिंदुस्थान पोस्ट'ने निकालापूर्वी दिले होते वृत्त

राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार ३० जागांवर निवडणूक येतील आणि महायुतीला १८ जागांवर समाधान मानावे लागेल असा अहवाल राज्यातील गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेला हा अहवाल अचूक निघाला आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने निकालापूर्वी हे वृत्त दिले होते. (Intelligence Survey Report)

प्रत्येक निवडणुकीत राज्य तसेच केंद्रातील गुप्तचर यंत्रणाचा सर्व्हे असतो. या सर्व्हेत यंत्रणांकडून सर्व स्रोतांचा वापर करून एक प्राथमिक अंदाज अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सोपवला जातो. गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालाचे अंदाज ९० टक्क्यांपर्यंत खरे ठरत असल्याने राजकीय पक्षांचेही या अहवालाकडे लक्ष लागलेले असते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महाराष्ट्र राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रातील एका यंत्रणेने दिलेले अहवाल आणि ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष निकालातील अंदाज अचूक ठरला. (Intelligence Survey Report)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यात कोणाचे पारडे जड; गुप्तचर यंत्रणेचे सर्वेक्षण काय सांगते?)

Screenshot 2024 06 05 180958

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) २८ जागांवर निवडून येईल आणि २० जागा महायुतीच्या पारड्यात पडतील असे राज्यातील गुप्तचर यंत्रणांच्या सर्व्हेक्षण अहवालात अंदाज बांधण्यात आला होता. तसेच मुंबईतील विशेष शाखेकडून मुंबईत ४ जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि दोन जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून येथील असा अहवाल तयार करण्यात आला होता. तसेच केंद्रातील एका गुप्तचर यंत्रणेने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून येतील आणि महायुतीला १८ जागा मिळतील असा अहवाल तयार केला होता. गुप्तचर यंत्रणाचा हा सर्वेक्षण अहवाल सोमवारी लागलेल्या निकालावरून परफेक्ट ठरला आहे, ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने गुप्तचर यंत्रणेतील सूत्राचा हवाला देऊन या संदर्भातील वृत्त निकालापूर्वी प्रसिद्ध केले होते. (Intelligence Survey Report)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.