‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’   

286
‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’   
‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’   

देशासह राज्यात १८ व्या लोकसभा मतदानाची रणधुमाळी अखेर ४ जून रोजी संपली. यंदा निवडणुकीच्या वेळी इंडि आघाडी (India Alliance) आणि एनडीए (NDA) यांच्यात लोकसभा निवडणुकीची रंगीत लढत झाली. या लोकसभा निवडणुकीत एनडीए २९१ जागा मिळाल्या असून, इंडि आघाडीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. परिणामी तिसऱ्या वेळी सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वी मोदी यांनी शेवटच्या मंत्रिपरिषदेला संबोधित केले. भाजपाला बहुमत मिळाले नाही परंतु एनडीएला बहुमत मिळाले यामुळे मंत्रिमंडळात काहीसे नाराजीचे वातावरण होते. यावर मोदींनी जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे, आकड्यांचा खेळ सुरूच राहतो, असे म्हटले आहे. (PM Narendra Modi)

यावेळी मोदी यांनी लोकसभेच्या निकालावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आम्ही दहा वर्षे चांगले काम केले आहे आणि भविष्यातही करू, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. सत्ताधारी आघाडी जनतेच्या सर्व अपेक्षांवर खरी उतरली आहे. तुम्ही सर्वांनी चांगले काम केले आहे, खूप मेहनत केली आहे, असे म्हणत मोदींनी सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा –Naveen Patnaik: अखेर ओडीशात BJD ची २४ वर्षांची सत्ता संपणार; भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार )

सकाळी ११:३० वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली. मोदी २.० कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. आता चार वाजता पुन्हा एनडीएच्या नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली आणि पुढील रणनिती ठरणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या बैठकीला हजर आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला गेले आहेत. अजित पवारांनी या बैठकीला जाणे टाळले आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.