Exit Poll : ‘एक्झिट पोल’ तोंडघशी का पडले?

204
Exit Poll : ‘एक्झिट पोल’ तोंडघशी का पडले?

देशातीलच नव्हे तर राज्यातीलही लोकसभा जागांबाबत बहुतांश निवडणूक पश्चात अंदाज (Exit Poll) तोंडावर आपटले. याचे कारण काय? याबाबत एक्झिट पोल तज्ञांना विचारले असता काही घटक आणि गणिते गृहीत धरल्याने अंदाज चुकल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. (Exit Poll)

जातीय गणिताचा अंदाज चुकला

‘जन की बात’चे प्रदीप भंडारी, ज्यांनी केंद्रातील सत्ताधारी ‘एनडीए’ला ३६२ ते ३९२ जागा मिळतील तर विरोधी आघाडीला १४१ ते १६१ जागांवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. याबाबत बोलताना भंडारी म्हणाले की, यावेळी अंदाज चुकला आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये सरकारविरोधी जनमत (anti-incumbency) आणि जातीय गणिते समजून घेण्यात या संस्था अयशस्वी ठरल्या. शेवटी, हे आकडेवारीचे शास्त्रीय विश्लेषण, यावर आधारित आहे आणि उत्तर प्रदेशात इतक्या टोकापर्यंत जातीचा प्रभाव परिणाम करू शकतो, यांचा अंदाज येऊ शकला नाही, असे भंडारी यांनी स्पष्ट केले. (Exit Poll)

(हेही वाचा – Share Market : निफ्टी आणि सेन्सेक्सने निवडणुकांचं दडपण झुगारलं, शेअर बाजार निवडणूक पूर्व स्तरावर परतले)

राज्यात ४८ लोकसभा जागांपैकी ३० जागांवर भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला यश मिळेल तर १८ जागांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला समाधान मानावे लागेल, असे ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या या डिजिटल मीडियाने केलेल्या मतदान-पश्चात सर्वेक्षणात म्हटले होते. सर्वेक्षणात मुंबई महानगरातील (एमएमआर) सर्व दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज दिला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीला १७ आणि ३१ महाविकास आघाडीला जागा गेल्या. (Exit Poll)

मतांचे ध्रुवीकरण

याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’चे सल्लागार मयूर परिख यांनी सांगितले की, “आपण व्यक्त केलेल्या राज्यातील ४८ जागांपैकी २८ जागांवरील अंदाज बरोबर निघाले तर २० चुकले. याचे कारण उद्धव ठाकरे आणि शिवसेना (शिंदे) तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी हे पक्ष प्रथमच निवडणुकीत उतरले असल्याने त्यांचा यापूर्वीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांच्या मतांचा अंदाज चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अल्पसंख्यांक समुदयासाठी काही चांगले निर्णय घेतले त्याचा परिणाम म्हणून म्हणून ‘एनडीए’ला मते मिळतील असा अंदाज होता पण तसे न होता मतांचे ध्रुवीकरण झाले आणि विरोधी पक्षांना एकगठ्ठा पडली. अंदाज चुकण्याचे आणखी एक कारण म्हणजे काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि उबाठा गट यांची मते अनपेक्षितपणे एकमेकांमध्ये योग्य प्रमाणात स्थलांतरित (transfer) झाली,” असे मत परिख यांनी व्यक्त केले. (Exit Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.