- ऋजुता लुकतुके
नेदरलँड्स विरुद्ध नेपाळ हा टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) सामना तसा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधलाच. कारण, आशियाई स्तरावर आणि पात्रता फेऱ्यांमध्ये नेपाळनेही मोठमोठ्या धावसंख्या रचून क्रिकेटमध्ये आपली चुणूक दाखवली आहे. तर नेदरलँड्स आयसीसीच्या स्पर्धांपर्यंत पूर्वीच पोहोचलेला आहे. पण, त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आमने सामने आले तेव्हा मात्र गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर नेपाळची फलंदाजी गडगडली. आणि त्याचा थेट फायदा नेदरलँड्सला मिळाला. त्यांनी ६ गडी राखून सामन्यात विजय मिळवला. (T20 World Cup 2024)
पहिली फलंदाजी करणाऱ्या नेपाळला १०६ धावांत गुंडाळण्यात डच गोलंदाजांना यश आलं. आणि तिथेच सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. नेपाळसाठी कर्णधार रोहित पोडेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या. बाकी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. तर टीम प्रिंगल आणि लोगान व्हॅन बीक यांनी डच संघासाठी प्रत्येकी ३ गडी बाद केले. (T20 World Cup 2024)
Max O’Dowd’s gritty 54* guides the Netherlands to a victory against Nepal in Dallas 👏#T20WorldCup | #NEDvNEP | 📝: https://t.co/B1xT0kd9Xa pic.twitter.com/SeQZsP8F83
— ICC (@ICC) June 4, 2024
(हेही वाचा – ‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’)
डॅलसमधील खेळपट्टीचं स्वरुप पाहता डच संघाला १०७ धावा करतानाही १८ षटकं वाट बघावी लागली. मॅक्स ओ दॉडने नाबाद ५४ धावा करत नेदरलँड्सला विजयाच्या मार्गावर नेलं. २० धावांत ३ बळी मिळवणारा टीम प्रिंगल सामनावीर ठरला. वेस्ट इंडिजमध्ये सोमवारी इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड हा सामना मात्र पावसात वाहून गेला. बार्बाडोसमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. आणि स्कॉटलंडने १० षटकांत नाबाद ८० धावा केल्या असताना सुरू झालेला पाऊस थांबलाच नाही. अखेर हा सामना रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community