लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या सातही टप्प्यातील मतदानाचे निकाल हे ४ जून रोजी लागले. यामुळे महाविकास आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) ३० जागा निवडून आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या (BJP) वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याची घाई नसल्याचे विधान केले. महाविकस आघाडीच्या जास्त जागा पाहून, एकनाथ खडसे यांचे मत परिवर्तन झाल्याचे दिसून येते. (Eknath Khadse)
(हेही वाचा – ‘आकड्यांचा खेळ सुरूच राहील’, शेवटच्या मंत्रीपरिषदेमध्ये PM Narendra Modi यांचे ‘संकेत’ )
एकनाथ खडसे यांनी निवडणुकीच्या आधी शरद पवार (Sharad Pawar) गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं सांगत राहिले. परंतु त्यांच्या प्रवेशावर भाजपाच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला. याठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यात. परंतु राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर मला आता भाजपमध्ये जाण्याची घाई नाही, असे विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : हार्दिकची नेट्समध्ये रोहित शर्माला गोलंदाजी)
पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा आम्ही जिंकल्या आहेत. माझ्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. यातच याठिकाणी आधीच भाजपाची ताकद होती. त्यानंतर आमची देखील याठिकाणी ताकद झाली. (Eknath Khadse)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community