Lok Sabha Election Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रातील खासदाराची धमकी, तर मी पदाचा राजीनामाच देईन!

374
Lok Sabha Election 2024 : लोकसभेत क्षेत्रीय पक्षच 'दादा'च्या भूमिकेत

लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा जुळवून एनडीए (NDA) सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या प्रयत्नात असताना राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या एका खासदाराला तर चक्क मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. अवघ्या काठावर पडलेल्या मतावर निवडून आलेल्या या खासदाराने जर मला यावेळी मंत्रीपद न मिळाल्यास मी राजीनामा देईन असाच पावित्रा घेत एक धमकी वजा इशाराच पक्षाला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिला असल्याची माहिती मिळत आहे. (Lok Sabha Election Result 2024)

लोकसभा निवडणूक २४मध्ये देशात एनडीएला (NDA) २९३ आणि इंडि आघाडीचे २३३ खासदार निवडून आले असून सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीए दावा करणार आहे. सत्ता स्थापनेसाठी एनडीएच्या बैठका होत आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीत काँग्रेसला १३, भाजपा ९, उबाठा शिवसेना ९, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष १ अशाप्रकारे खासदार निवडून आले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीला केवळ १७ आणि एका अपक्षासह महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात भाजपाच नंबर वन; काय सांगते आकडेवारी?)

त्यामुळे राज्यात महायुतीला मोठे अपयश आलेले असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या एका खासदाराने तर यावेळी आपल्याला मंत्रीपद हवेच आहे. जर आपल्याला मोदी सरकारमध्ये मंत्री पद न मिळाल्यास आपण खासदार पदाचाच राजीनामा देऊ इथपर्यंत बोलण्याची मजल या नवनिर्वाचित खासदाराची झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात दहा खासदार निवडून आले असून त्यामध्ये महायुतीचे चार आणि महाविकास आघाडीचे पाच खासदार आणि एक अपक्ष खासदार निवडून आला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या या खासदाराला यंदा मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागल्याने त्यांच्या या धमकीवजा इशाऱ्यामुळे कार्यकर्तेही अचंबित झाले आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.