Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार; नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला समर्थनाची पत्रे सोपवली  

253
Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार; नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला समर्थनाची पत्रे सोपवली  

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएची (NDA Meeting) बैठक बुधवारी संपन्न झाली. दरम्यान, नितीश कुमार (Nitesh Kumar) आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu)  यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी बैठकीत समर्थनाची पत्रे (Support Letter) सादर केली आहेत. अशा स्थितीत आता एनडीएच्या बैठकीनंतर सर्व नेते सरकार स्थापनेचा दावा मांडण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

एनडीएच्या बैठकीत हे नेते उपस्थित होते

पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीत औप्रिया पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जीतन राम माझी, चिराग पासवान यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. या कारणास्तव त्यांना मित्र पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत असे चित्र दिसून येते. या निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ३२ ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण २८ जागा आहेत. भाजपाच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.

(हेही वाचा – Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!)

मुख्यमंत्री शिंदेंचं पाठिंबा 

या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील नरेंद्र मोदी यांना समर्थन असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना शिंदेंनी लिहिले की, ‘लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.  इतर पक्षाप्रमाणे शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.