- विशेष प्रतिनिधी, मुंबई
धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणी सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने महापालिकेला दिल्या. (BMC)
मुंबईतील मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) या मुंबई शहर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आहेत तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) हे मुंबई उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनात महानगरपालिका मुख्यालयात पावसाळापूर्व समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी महानगरपालिकेच्या व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. (BMC)
मुंबई पोलीस दलाचे सह पोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे (Anil Kumbhare), महानगरपालिका सह आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी , राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.), एम.टी.एन.एल., त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे विविध परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख, मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी यांच्यासह संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (BMC)
पावसाळ्याच्या तोंडावर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात विविध स्तरीय कामे सुरू आहेत. या सर्व कामांची नियमितपणे पाहणी करावी , तसेच आपापल्या क्षेत्रात असलेल्या विविध यंत्रणांशी समन्वय साधावा. धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून तातडीने कार्यवाही करावी. स्थानिकांचे स्थलांतर सुयोग्य ठिकाणी करावे , असे निर्देश मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले. तर, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणी सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले. (BMC)
बैठकीच्या प्रारंभी संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध साधक-बाधक बाबींवर या प्रसंगी चर्चा झाली. (BMC)
(हेही वाचा- Vanchit Bahujan Aghadi ला का मिळाली किंचित मते?)
अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी (Ashwini Joshi) यांनी निर्देशित केले की, मुंबईतील धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात. स्थानिकांचे योग्य प्रकारे स्थलांतर करावे , महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरु असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करावी. (BMC)
पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. पाऊस कोसळत असताना वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुरळीतपणे व अव्याहतपणे सुरू राहावी याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देखील त्यांनी दिले. (BMC)
(हेही वाचा- Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात भाजपाला जागा का कमी मिळाल्या? कॅप्टन रिझवी यांनी सांगितली कारणे..)
अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांनी निर्देशित केले की, दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणीही सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी. पावसाळ्या दरम्यान झाड कोसळल्यास प्रमाणित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी. विशेषत: रेल्वेमार्गाच्या दुतर्फा वाहतुकीस अडथळा ठरणा-या झाडांच्या फांद्यांची सुयोग्य छाटणी करावी. तसेच, दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. समुद्रात ज्या दिवशी अधिक उंचीच्या लाटा उसळणार असतील त्या दिवशी अधिक दक्षतेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी मुंबई अग्निशमन दल, विभाग कार्यालय व आपत्कालीन व्यवस्थापन विभागास दिले. (BMC)
यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे करण्यात येत असलेल्या व करण्यात येणा-या विविध कामांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, आणि प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये, उद्यान खाते यांची माहितीही सादर करण्यात आली.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community