अमरावती या मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नवणीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला आहे. येथे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्या मतं टाकली आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्या थेट मुंबईत गेल्या होत्या. पण पोलीसांनी त्यांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण बरंच गाजलं. राणा यांच्याविरोधात तेव्हा गुन्हादेखील दाखल झाला होता. (Navneet Rana)
(हेही वाचा –अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा ‘अवकाशभरारी’)
दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. त्यांना एकूण 5 लाख 26 हजार 271 मतं मिळाली. दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना 5 लाख 65 हजार 40 मते मिळाली आहेत. (Navneet Rana)
(हेही वाचा –T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर दणक्यात विजय, रोहितच्या दुखापतीची चिंता )
राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला आहे. महायुतीचा भाग असलेल्या प्रहार जनशक्ती या पक्षानेही अमावतीतून उमेदवार दिला होता. त्यांच्या बळवंत बुब या उमेदवाराला 85 हजार 300 मते मिळाली आहेत. म्हणजेच प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटली आहेत. (Navneet Rana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community