Lok Sabha Results : यामिनी जाधव यांचा भायखळ्यानेच केला घात

405
Lok Sabha Results : यामिनी जाधव यांचा भायखळ्यानेच केला घात
Lok Sabha Results : यामिनी जाधव यांचा भायखळ्यानेच केला घात
  • सचिन धानजी,मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रीक साधली.  यापूर्वी दोन वेळा मोदीच्या लाटेवर निवडून आलेले सावंत यंदा मात्र मोदी विरोधी असलेल्या मुस्लिम समाजाच्या लाटेवर निवडून आले. शिवसेनेच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा पराभव हा ना उबाठा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांत झाला ना भाजपाच्या बालेकिल्ल्यात झाला. जाधव यांचा हा पराभव त्यांच्या स्वत:च्या विधानसभा मतदार संघात झाला आहे. भायखळ्यातील मतदारांनीच घात केल्याने  यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा हा पराभव झाला असून मुंबादेवी आणि भायखळा या दोनच मतदार संघातील आघाडीवर सावंतांना विजयाची हॅटट्रीक साधता आलेली आहे. (Lok Sabha Results)

(हेही वाचा- BMC : धोकादायक इमारती आणि संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणांवर तातडीने कार्यवाही )

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्यावतीने यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) आणि उबाठा शिवसेनेच्यावतीने अरविंद सावंत (Arvind Sawant) हे निवडणूक रिंगणात होते. मात्र मतदानाच्या दिवशी कुलाब्यातील घटलेला टक्का आणि मुंबादेवी व भायखळा येथील वाढलेला मतांचा टक्का हा महायुतीच्या उमेदवाराच्या ह्दयाचा ठोका चुकवणारा होता आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी दिलासा देणारा होता. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये यामिनी जाधव (Yamini Jadhav) या आघाडीवर राहिल्या. परंतु तिसऱ्या फेरीपासून त्या मागे पडल्या त्या काही पुढे गेल्याच नाही. प्रत्येक फेरीगणित सावंत यांचे चार ते पाच हजारांची मतांची आघाडी वाढतच चालली होती. त्यामुळे २० व्या फेरीअखेर सावंत हे ५२ हजार ६७३ मतांनी आघाडी घेत विजयी झाले. विशेष म्हणजे वंचितने याठिकाणी अफझल दाऊदानी यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनाही जास्त मते मिळवता आली नाही. त्यांना केवळ ५६०० मतेच मिळवता आली. अपक्ष उमेदवार अरविंद सावंत यांनाही केवळ ३०९० मतेच मिळाली, तर नोटाला १३,४११ मतेच मिळाली. मुस्लिम उमेदवार याठिकाणी विविध छोटे पक्ष व अपक्षांसह ६ मुस्लिम उमेदवार असूनही यावेळेस मुस्लिम समाजाने मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घेत मोदींच्या विरोधात मतांची झोळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजुने रिती केली. (Lok Sabha Results)

भाजपाचे बालेकिल्ला असलेल्या मलबार हिलमध्ये यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना ८७ हजार ८६० मतदान झाले आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना ३९ हजार ५७३ मतदान झाले. त्यामुळे या मतदार संघात यामिनी जाधव यांना ३८ हजारांची आघाडी मिळाली. तर सर्वांत कमी मतदान झालेल्या भाजपाच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यात अर्थांत कुलाब्यात यामिनी जाधव यांना ५८,६४५ आणि सावंत यांना ४८,९१३ मते मिळाली. म्हणजे जाधव यांना सुमारे दहा हजारांची आघाडी मिळाली, कुलाब्यात जर जास्त मतदान झाले असते तर कदाचित जाधव यांची आघाडी वाढली असती आणि इतर ठिकाणी सावंतच्या यांच्या मतांतील फरक त्या कापू शकल्या असत्या. (Lok Sabha Results)

(हेही वाचा- अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा ‘अवकाशभरारी’)

परंतु जाधव यांच्या स्वत:च्या विधानसभा क्षेत्रात त्यांना केवळ ४०, ८१७ मते आणि सावंत (Arvind Sawant) यांना ८६, ८८३ मते मिळाली. त्यामुळे स्वत:च्या मतदार संघातच यामिनी जाधव या ४६ हजार मतांनी मागे पडल्या आणि सावंतांना आघाडी मिळाली. विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातील मुस्लिमांनी यामिनी यांच्या बाजुने भरभरुन केलेले मतदान आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या मनोज जामसुतकर यांनी केलेले प्रयत्न यामुळे भायखळ्यात धनुष्यबाण चालला होता. परंतु नेमके यावेळी मुस्लिम मतदार जाधव यांच्यासोबत राहिले नाही आणि जामसुतकर हे उबाठा सोबतच राहिल्याने सावंत यांना ते भायखळ्यात ४६ हजारांची आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरले. विशेष म्हणजे विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांनी मनसैनिकांना फोडून शिवसेनेत घेण्याचा प्रकार सुरु केल्याने याचा राग मनसैनिकांना होता. त्यामुळे मनसेचा पाठिंबा असला तरी प्रत्यक्षात मनसेने यामिनी जाधव यांच्या बाजुने मतदान केले नाही आणि त्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराचा मतांचा टक्का या मतदार संघात घसरल्याचे दिसून येते. (Lok Sabha Results)

शिवडी विधानसभा क्षेत्र हा उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही सावंत यांना जास्त मतांची आघाडी घेता आलली नाही. याठिकाणी सांवत यांना ७६, ०५३ मते मिळाली तर जाधव यांना ५९, १५० मते मिळाली.म्हणजे सुमारे १७ हजारांची आघाडी घेता आली. या मतदार संघाची बांधणी आता भाजपाकडून सुरु असून त्यातच यशवंत जाधव (Yamini Jadhav) यांनीही बांधणी केल्याने काही प्रमाणात महायुतीच्या बाजुने मतदान झुकवण्यात ते यशस्वी ठरले. (Lok Sabha Results)

(हेही वाचा- Shivrajyabhishek Sohala : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड सजले!)

तर आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळीमध्ये सहा त साडेसहा हजारांचीच आघाडी सावंत यांना मिळाली. सावंत यांना या मतदार संघात ६४, ८४४ मते तर जाधव यांना ५८, १२० मतदान झाले. त्यामुळे खुद्द आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात मोठी आघाडी सावंत यांना मिळवता आलेली नसून शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदार संघात  झालेले हे मतदान ही समाधानाची बाब आहे. (Lok Sabha Results)

तर भायखळ्या पाठोपाठ मुंबादेवी या मतदान संघाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयातच बांध घालून ठेवला. मुंबादेवी मतदार संघात सावंत यांना ७७, ४६९ मतदान झाले आणि जाधव (Yamini Jadhav) यांना ३६,६९० मतदान झाले. म्हणजे ४० हजार  ७७९ मतांची आघाडी या मतदार संघाने सावंत यांना दिली. त्यामुळे भायखळा ४६ हजार आणि मुंबादेवी ४० हजार अशाप्रकारे या दोनच मतदार संघाने सावंत यांना तब्बल ८६ ते ८७ हजारांची आघाडी मिळवून दिली. (Lok Sabha Results)

(हेही वाचा- Shivrajyabhishek Sohala : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड सजले!)

त्यामुळे हा पराभव जाधव यांचा नसून महायुतीचा झालेला आहे. जाधव यांचा पराभव हा सुमारे ५२ हजारांनी झाला, पण भाजपाच्यावतीने मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे  निवडणूक रिंगणात उतरले असते तर सावंत अधिक मताधिक्यांनी विजयी झाले असते,अशाप्रकारचे येथील वातावरण होते. त्यामुळे दक्षिण मुंबईतील सर्व मुस्लिम समाजाने एकत्र येत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. मागील विधानसभेला यामिनी जाधव या महायुतीच्या उमेदवार होत्या आणि भाजपासोबत युती असतानाही जाधव यांना वैयक्तिक संबंधांच्या जोरावर मुस्लिम समाजाने मतदान केले होते. परंत यावेळेस याच मुस्लिम समाजाने त्यांना जोडून पाठ  दाखवल्याने ते मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवू शकले नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे स्वत:च्या मतदार संघात यामिनी जाधव या तब्बल ४६ हजारांनी पिछाडीवर पडल्या आणि इथून पुढे मुंबादेवीतील मतदारांनी आपले काम फत्ते केले. परंतु एका बाजुला मातब्बर उमेदवार हे लाखो मतांच्या फरकाने पराभूत झाले तिथे यामिनी जाधव या केवळ ५२ हजारांनी कमी पडल्या. त्यामुळे भायखळ्यातील या रणरागिणीने चांगली लढत दिली असेच म्हणावे लागेल. (Lok Sabha Results)

उमेदवारांना मिळालेली मते

अरविंद सावंत, उबाठा शिवसेना : ३, ९५,६५५

यामिनी जाधव, शिवसेना : ३, ४२, ९८२

नोटा : १३,४११

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.