T20 WC, Ind vs Ire : जसप्रीत बुमराने मोडला भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम 

T20 WC, Ind vs Ire : जसप्रीत बुमराने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात दणक्यात केली आहे 

155
T20 WC, Ind vs Ire : जसप्रीत बुमराने मोडला भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम 
T20 WC, Ind vs Ire : जसप्रीत बुमराने मोडला भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम 
  • ऋजुता लुकतुके 

जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) आपल्या अचूक आणि तरीही जलदगती माऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चं वेगळं स्थान मिळवलं आहे. तीच हुकुमत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आहे. टी-२० क्रिकेट (T20 WC, Ind vs Ire) हा खरंतर फलंदाजांचा आणि त्यातही घणाघाती फलंदाजी करणाऱ्यांचा खेळ. पण, जसप्रीत बुमरासारखे (Jasprit Bumrah) गोलंदाज इथंही आपली कामगिरी चोख पार पाडतात. आयर्लंड विरुद्ध जसप्रीत बुमराला (Jasprit Bumrah) पाचव्या षटकांत गोलंदाजीची संधी मिळाली. त्याने आपलं पहिलंच षटक निर्धाव टाकलं. हा बुमराचा एक नवीन विक्रम ठरलाय. (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर दणक्यात विजय, रोहितच्या दुखापतीची चिंता )

त्याने निर्धाव षटकांच्या बाबतीत भारताच्याच भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) मागे टाकलंय. कसोटीचा दर्जा असलेल्या क्रिकेट संघांमध्ये टी-२० प्रकारात सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम आता बुमराच्या नावावर जमा झाला आहे. (T20 WC, Ind vs Ire)

यापूर्वी भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) १० निर्धाव षटकं टाकली होती. पण, आता बुमराच्या नावावर ११ षटकं जमा झाली आहेत. त्याची षटकामागे धावगतीही ६.६ इतकी कमी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ७५ सामने खेळलेल्या तेज गोलंदाजांत बुमराचा (Jasprit Bumrah) क्रमांक या बाबाबतीत अव्वल आहे. निर्धाव षटकांच्या बाबतीत आयसीसीचा असोसिएट दर्जा असलेल्या संघांचे दोन गोलंदाज हे बुमराच्या पुढे आहेत. युगांडाचा फ्रँक नसुबुगाने १५ तर केनियाच्या शेम एनगोकेनं १४ निर्धाव षटकं टाकली आहेत. (T20 WC, Ind vs Ire)

(हेही वाचा- अमरावतीतून Navneet Rana पराभूत, ठाकरे गटाचे कार्यकर्ते करणार हनुमान चालिसा पठण!)

टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यांत बुमराने आपल्या ३ षटकांत फक्त ६ धावा देत २ बळी घेतले. जोश लिटिलला त्याने आपल्या हुकमी यॉर्करवर बाद केलं. सामनावीराचा पुरस्कारही बुमरालाच मिळाला. (T20 WC, Ind vs Ire)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.