मुंबईत आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान भीषण घटना घडली. या घरगुती गॅस सिलेंडर स्फोट (Domestic gas cylinder explosion) ऐवढा भीषण होता की आजूबाजूला असणाऱ्या अनेक घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या तर काही घरच्या भिंती देखील कोसळल्या. या घटनेत तब्बल १० जण जखमी झाले असून यातील काही जण हे गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला याचे कारण समजू शकले नाही. (Chembur Cylinder Blast)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सीजी गिडवाणी रोड, स्मोक हिल सलूनच्या मागे, गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका घरात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत ओम लिंबाजिया (वय ९), अजय लिंबाजिया (वय ३३), पूनम लिंबाजिया (वय ३५), मेहक लिंबाजिया (वय ११), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय ५३), पियुष लिंबाजिया (वय २५), नितीन लिंबाजिया (वय ५५), प्रीती लिंबाजिया (वय ३४), सुदाम शिरसाट (वय ५५) हे गंभीर जखमी झाले असून या सर्वांना सायन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!)
दरम्यान, स्वयंपाक घरातील सिलेंडर स्फोटात जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस (Mumbai Police) आणि मुंबई अग्निशमन विभागाच्या (Mumbai Fire Brigade) तीन फायर गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहे. (Chembur Cylinder Blast)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community