ICC T20 Rankings : दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्येची आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत मुसंडी

ICC T20 Rankings : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नॉर्येनं ७ धावांत ४ बळी मिळवले आहेत.

167
ICC T20 Rankings : दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्येची आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत मुसंडी
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात एनरिच नॉर्येनं ७ धावांत ४ बळी टिपत लंकन फलंदाजीला खिंडार पाडलं. हा सामना आफ्रिकन संघाने जिंकलाच. शिवाय नॉर्येला या कामगिरीचा फायदा आयसीसीच्या (ICC) ताज्या टी-२० क्रमवारीत झालेलाही दिसतोय. नॉर्यनं एकदम ९ जागांची भरारी क्रमवारीत घेतली आहे. तेज गोलंदाजांच्या यादीत तर तर तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. (ICC T20 Rankings)

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड हा तेज गोलंदाजाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत पहिल्या चार क्रमांकांवर फिरकीपटूंचंच वर्चस्व दिसत आहे. इंग्लंडचा आदिल रशिद अव्वल क्रमांक टिकवून आहे. तर त्याखालोखाल श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आहे. तर भारताचा अक्षर पटेल या यादीत तिसरं स्थान टिकवून आहे. अफगाणिस्तानचा तेज गोलंदाज फझलहक फारुखीने युगांडा विरुद्ध केलेल्या चमकदार कामगिरीनंतर तो पहिल्या दहांत आला आहे. त्यामुळे पहिल्या दहांत आता फक्त ३ तेज गोलंदाज आहेत. (ICC T20 Rankings)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!)

टी-२० (T20) प्रकारात फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव आपलं अव्वल स्थान टिकवून आहे. अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा सामन्यात अफगाण सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झरदान यांनी १५४ धावांची सलामी दिली होती. या कामगिरीनंतर दोघांनी फलंदाजांच्या क्रमवारीत आगेकूच केली आहे. २० वर्षीय गुरबाझ पहिल्यांदाच पहिल्या वीसांत पोहोचला आहे. तर इरदानही आता २४व्या क्रमांकावर आहे. (ICC T20 Rankings)

फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये या आठवड्यात कुठलाही बदल झालेला नाही. सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट आणि मोहम्मद रिझवान यांनी आपले पहिले तीन क्रमांक कायम राखले आहेत. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शकीब अल हसन पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आता दुसऱ्या स्थानावर आहे. (ICC T20 Rankings)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.