ठाण्यातील धावपटूंची धाव साऊथ आफ्रिकेपर्यंत; 90 किलोमीटर Ultra Marathon मध्ये घेणार सहभाग

धावपटूंना भारताचा झेंडा दिला जातो. ४ जून रोजी सकाळी ६.३० ते ७ वेळेत ठाण्यातील सात धावपटूंसाठी श्री पलाय देवी मंदिर परिसर, उपवन येथे स्टॅंडर्ड ठाणे सेंटरच्या वतीने 'गुड लक Comarades Marathon' आयोजित करण्यात आला.

150
ठाण्यातील धावपटूंची धाव साऊथ आफ्रिकेपर्यंत; 90 किलोमीटर Ultra Marathon मध्ये घेणार सहभाग
ठाण्यातील धावपटूंची धाव साऊथ आफ्रिकेपर्यंत; 90 किलोमीटर Ultra Marathon मध्ये घेणार सहभाग

साऊथ आफ्रिकेतील डर्बन ते पीटरमार्टीझबर्ग येथे ९ जून २०२४ रोजी ९७ वी ९० किलोमीटर कॉमेड्स मॅरेथॉन (Comarades Marathon) होत आहे. जगभरातून एकूण २५००० धावपटू यात सहभाग घेणार आहेत. भारतातून ३२३ धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये ठाण्यातील (Thane) ७ मॅरेथॉन धावपटूंचा समावेश आहे.

(हेही वाचा – Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्यासारखी ५ प्रमुख ठिकाणे!)

दरवर्षी या धावपटूंसाठी शहरोशहरी ‘गुड लक कॉमेड्स रन’ आयोजित केले जातात. त्यात धावपटूंना भारताचा झेंडा दिला जातो. ४ जून रोजी सकाळी ६.३० ते ७ वेळेत ठाण्यातील सात धावपटूंसाठी श्री पलाय देवी मंदिर परिसर, उपवन येथे स्टॅंडर्ड ठाणे सेंटरच्या वतीने ‘गुड लक कॉमेड्स रन’ आयोजित करण्यात आला.

कोण होणार सहभागी

साउथ आफ्रिकेत होणाऱ्या या 90 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर, रामनाथ मेंगळ, चिन्मय सेनगुप्ता, विवेक ठिलकन, प्रशांत सिन्हा, निखिल, कुमारी विद्या यांचा सहभाग असणार आहे. प्रथेप्रमाणे या धावपटूंना तिरंगा देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी “भारतीय संघाने तयार केलेला टी-शर्ट आणि जॅकेट घालून या स्पर्धेत भाग घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे”,असे मनोगत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.