भगूर येथे Shivrajyabhishek Sohala उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या Shivrajyabhishek Sohala सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला शरद करंजकर व प्रशांत लोया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

178
भगूर येथे Shivrajyabhishek Sohala उत्साहात साजरा
भगूर येथे Shivrajyabhishek Sohala उत्साहात साजरा

हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) भगूर, नाशिक येथे भगूरपुत्र (Bhagur) स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) समुहाच्या वतीने साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला शरद करंजकर व प्रशांत लोया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

(हेही वाचा – Rohan Bopanna, French Open 2024 : भारताचा रोहन बोपान्ना फ्रेंच ओपन दुहेरीत उपान्त्य फेरीत )

राज्याभिषेक सोहळ्याने स्वातंत्र्याचा पाया रचला

या वेळी ओम देशमुख यांनी शिवराज्याभिषेकाचे (Shivrajyabhishek Sohala) ऐतिहासिक महत्त्व सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला इतिहासासोबतच लोकांच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे आपण जाणतोच. मात्र यामागे असलेले ऐतिहासिक महत्त्व म्हणजे ‘मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष’ या न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या ग्रंथामध्ये याबाबतचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

छ. शिवरायांनी स्वराज्य स्थापित करत देशाच्या इतिहासाला नवसंजीवनी दिली होती. परकीय आक्रमणातील धूर्त आणि दुष्ट शत्रूंचा नायनाट करुन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौल्यवान कार्य राजांनी केले होते. शिवराज्याभिषेक हा गोरगरीब, दीन-दुबळ्या जनतेच्या नवआयुष्याचा आणि उत्साहाचा सार सांगणारा सोहळा होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सामाजिक न्याय, बंधुता आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा पाया रचला होता.

प्रसंगी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी समूहाचे मनोज कुवर, सुनिल जोरे, संदेश बुरके, संभाजी देशमुख, आशिष वाघ, प्रविण वाघ, सचिन जंगम, ललित भदे, नीलेश हासे आदी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.