Lok Sabha Election Result : मुंबई, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात NOTA चा बोलबाला

बिहार, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, आसाम, गोवा, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांत NOTA ला सर्वाधिक मतदान करणारी टॉप-10 राज्ये आहेत.

231

शभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली. या निवडणुकीत जो निकाल लागला, त्यामध्ये भाजपाचे मोठे नुकसान झाले, पक्षाने ४०० पारची घोषणा केली होती, तशी महाराष्ट्रात ४५ पारची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात देशात एनडीए २९२ पर्यंत सीमित राहिली, तर महाराष्ट्रात केवळ १६ जागा जिंकता आल्या आहेत. आता मतांचे नुकसान कुठे झाले, मत विभागणी कुठे झाली याची विश्लेषण सुरु झाले असतानाच यंदाच्या निवडणुकीत अशा काही जागा आहेत, ज्यात नोटाला पडलेल्या मतांचा फटका बसला आहे.

मुंबईत ७५ हजार मुंबईकरांनी दाबले NOTAचे बटण 

शिवसेना आणि काँग्रेस पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. तर या निवडणुकीच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले होते. लोकसभा निवडणूक निकालात मुंबई महायुतीचे दोन उमेदवार आणि महाविकास आघाडीचे एकूण ४ उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र यंदा राज्यातील सत्तासंघर्षाला कंटाळलेल्या जवळपास ७५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याला पसंती दिली आहे.

(हेही वाचा Vanchit Bahujan Aghadi ला का मिळाली किंचित मते?)

NOTA च्या पसंतीमागे कारणे 

सत्तासंघर्षाचा मागील ५ वर्षांचा कार्यकाळ पाहता सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर  जनता नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने सत्तासंघर्षांचे विविध अंक पाहिले. राजकीय पक्षांमधील फूट, दिग्गज नेत्यांचे बंड, सत्तेसाठी जुळलेली अनपेक्षित समीकरणे आणि अभूतपूर्व सत्तांतर पाहून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची चिरफाड झाली. अशी भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली होती. दरम्यान, मुंबई लोकसभा निवडणुकीत ६ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय खेचून आणत महायुतीला धक्का दिला. तर यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन करीत मुंबईत भाजपाकडून महायुतीचे खाते उघडले. तर शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेकडून खाते उघडले. मात्र, मुंबईकरांनी इतर पाच लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले. तसेच, ‘नोटा’च्या पर्यायाला मिळालेल्या मतांनीही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

मुंबई उत्तर पश्चिममध्ये सर्वाधिक १५ हजार NOTA  

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात तब्बल १३ हजार ४११, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात १३ हजार ४२३, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ९ हजार ७४९, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात १५ हजार १६१, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १३ हजार ३४६ आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात १० हजार १७३ अशा एकूण ७५ हजार २६३ मतदारांनी नापसंती दर्शवत ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याचे मतमोजणी अंती निदर्शनास आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील नेते मंडळीनी प्रचार सभेत भाजपा सत्तेत आल्यावर भारताच्या संविधानात बदल करेल, महागाई आणखी वाढवणार, भाजपा लोकशाहीला नाही तर हुकूमशाहीला प्राधान्य देईल. असे अपप्रचार करत नागरिकांचे मनपरिवर्तन केले. परिणामी लोकसभेचे मतदान हे ऐन उन्हाळ्यात घेतल्यामुळे गरमीच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी ‘नोटा’ पर्यायाला मतदान केल्याने दिसून येते.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार; नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला समर्थनाची पत्रे सोपवली  )

इंदूर मतदारसंघात NOTAची मते दुसऱ्या क्रमांकाची 

मध्य प्रदेशातील इंदूर हा असा मतदारसंघ होता, जिथे भाजपाचे विजयी उमेदवार शंकर लालवानी वगळता इतर सर्व १३ उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली. या जागेवर विजयी झालेल्या भाजपा उमेदवाराला १२ लाख २६ हजारांहून अधिक मते मिळाली, तर NOTA दुसऱ्या स्थानावर आहे, तिथे २ लाख १८ हजारांहून अधिक मते पडली. शंकर लालवानी यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांना सुमारे १ लाख १६ हजार मते मिळाली, जी NOTA पेक्षा कमी होती.

‘या’ 10 राज्यांमध्ये NOTA ला विषेश पसंती  

बिहार, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, आसाम, गोवा, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांत NOTA ला सर्वाधिक मतदान करणारी टॉप-10 राज्ये आहेत, जिथे लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला मतदान केले नाही. NOTA वर सर्वात कमी मतदान करणाऱ्या शीर्ष 10 राज्यांमध्ये नागालँड, लक्षद्वीप, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश होता. दिल्लीत कमी मतदान झाले असले तरी येथील लोकांनी NOTA वर मतदान करताना फारसा उत्साह दाखवला नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.