लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे पक्षातील आमदारांची चलबिचल थांबविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने करण्याच्या मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मांडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर विचार विनिमय करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. (Cabinet Expansion)
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतून विशेषता शिवसेना आणि अजित पवार गटातील काही आमदार आणि नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा धोका ओळखून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या १५ दिवसांमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. (Cabinet Expansion)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : युगांडाच्या एनसुबुगाची सगळ्यात किफायतशीर गोलंदाजी)
लोकसभेतील पराभवाला पक्षांतर्गत नाराजी हे कारण असल्याचा निष्कर्ष आजच्या बैठकीत काढण्यात आला. राज्यात सत्तेत सामील झाल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते यांना खुश ठेवायला पाहिजे होते मात्र मोजक्याच नेत्याना मंत्रीपदे मिळाल्यामुळे अन्य आमदार नाराज झाल्याचा सुर बैठकीत होता. त्या अनुषंगाने राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांचे वाटप झाले पाहिजे असा मतप्रवाह अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आहे. (Cabinet Expansion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community